मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉट्सन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या इंग्लंड दौर्यावर असलेल्या शेन वॉट्सन आज (रविवार) तात्काळ आपण कसोटी क्रिकेटला रामराम करत असल्याचे जाहीर केले. शेन वॉट्सनला नुकतेच इंग्लंडविरुद्ध झालेल्या ऍशेस मालिकेत संघाबाहेर ठेवण्यात आले होते. गेल्या काही सामन्यांत त्याची कामगिरी खराब होत होती. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते. त्याला एकदिवसीय सामन्यांतही प्रभाव पाडता आलेला नव्हता. अखेर त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.
वॉट्सनने आतापर्यंत कसोटी कारकिर्दीत 59 कसोटी सामने खेळले आहे. त्याने शेवटची कसोटी इंग्लंडविरुद्ध ऍशेस मालिकेत खेळली होती. मायकेल क्लार्क, ख्रिस रॉजर्स यांच्यानंतर आता वॉट्सननेही निवृत्ती जाहीर केल्याने ऑस्ट्रेलिया संघाला मोठा फटका बसला आहे.