मुंबई : डॉलरच्या तुलनेत सोमवारी रुपयाने पुन्हा गटांगळी खालली आहे. रुपया एवढा कोसळला की दोन वर्षांतील निचांकी पातळीवर गेला आहे. सोमवारी एका डॉलरची किंमत ६६.७८ रुपयांवर पोहोचली. रुपयामधील ही घसरण महागाईला निमंत्रण ठरु शकते. एक डॉलर ६८ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाले तर वाढत्या किंमतींनी जनतेचा खिसा कापला जाणार आहे.
इंडिया फॉरेक्सचे सीईओ अभिषेक गोयंका म्हणाले, चीनचे चलन यूआन चे मुल्य घटल्यानंतर आता भारतीय रुपयाला अमेरिकेतील वाढत्या व्याजदराची चिंता सतावत आहे. अमेरिकेत सप्टेंबरमध्ये व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचे कारण शुक्रवारी बेरोजगारांची आकडेवारी जारी झाली आहे. त्यामुळेच डॉलर इंडेक्स गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढून ९६ वर पोहोचला आहे.
रुपया कोसळल्याने सरकार विदेशातून आयात करणार्या वस्तूंवर खर्च वाढणार आहे. हा वाढता बोजा सर्वसामान्यांवर टाकला जाईल. त्यामुळे कार, एलईडी, मोबाइल, पेट्रोलियम पदार्थ, सोने यासह इम्पोर्ट केल्या जाणार्या वस्तूंचे दर वाढू शकतात. एक्सपोर्ट करणार्या कंपन्यांना मात्र याचा फायदा होता.