नवी मुंबई ः महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महापालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महापालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून सप्टेंबर महिन्याचा लोकशाही दिन ७ स्पटेंबर २०१५ रोजी संपन्न झाला. यामध्ये दाखल झालेल्या अतिक्रमण विभागाशी संबंधित एक निवेदनाबाबत अर्जदार आणि संबंधित विभाग प्रमुख यांच्याशी संयुक्त चर्चा करुन पुढील कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.
ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन येत्या ५ ऑक्टोबर २०१५ रोजी होणार
असून अर्जदाराने विहित महापालिका लोकशाही दिनात १ निवेदन नमुन्यात आपला अर्ज दोन प्रतिमध्ये १९ स्पटेंबर २०१५ पर्यंत आयुक्त, नवी मुंबई महापालिका यांचे नावे लोकशाही दिनाकरीता अर्ज असे दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचा आहे.
लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमुना नागरिकांसाठी महापालिका नुतन मुख्यालय इमारत, जनसंपर्क विभाग, तिसरा मजला, सेक्टर-१५ किल्ले गावठाण जवळ, सीबीडी-बेलापूर येथे विनामुल्य उपलब्ध असून
आहे, असे महापालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
सदर अर्जात नमुद तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. अर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावा. अर्जदाराने संबंधित विषयाबाबत याआधी विभाग कार्यालय, विभागप्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे.
यामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपिल्स, सेवाविषयक-आस्थापना विषयक बाबी याबाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. त्याचप्रमाणे विहित नमुन्यात
नसणारे आणि अर्जासोबत आवश्यक त्याकागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज
स्विकारले जाणार नाहीत. त्याशिवाय तक्रारी/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर तसेच यापूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे, अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत, घेता येऊ शकते याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे सूचित करण्यात येत आहे.