नवी मुंबई : महापालिका सभागृहातील कामकाजाचे वृत्तसंकलन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पत्रकारांकरीता स्वतंत्र दालन उपलब्ध करून दिले असले तरी या गॅलरीत पक्षीय पदाधिकारी, नगरसेविकांचे नवरे, माजी नगरसेवक व अन्य हवशागवशांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्यानेे बाजरबुणग्यांची गर्दीला कोणीतरी आवरा रे असा सूर आता पत्रकार मंडळींकडूनच आळविला जावू लागला आहे.
बुधवारी (दि. ९ सप्टेंबर) रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील गदारोळाचे वृत्तसंकलन करण्यासाठी पत्रकार व्यस्त असतानाच पत्रकार दालनात एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक, नगरसेविकांचे पती, राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि अन्य हवशागवशानवशाचाच वावर अधिक प्रमाणात होता. बिगर पत्रकार मंडळींचे वाढते अतिक्रमण व पत्रकार दालनातील त्यांची चर्चा यामुळे पत्रकार मंडळींमध्येच आता अस्वस्थता वाढीस लागली असून या बाजारबुणग्यांना आता कोणीतरी आवार रेऽऽऽ असा संतप्त सूर आता खुद्द पत्रकार मंडळींकडूनच आळविला जावू लागला आहे.