नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती पाहता प्रशासनामार्फ़त पाणी बचतीची विशेष मोहिम सुरु केली आहे. त्या अनुषंगाने दिघा विभाग कार्यालयाच्या अंतर्गत प्रभागात पाणी वाचवू या आणि दुष्काळावर मात करु या असा संदेश देत जनजागृती मोहिम गुरूवारी (ता.१०) गुरुवारी राबविण्यात आली.
रामनगर आणि परिसरात घरोघरी जाऊन पालिकेच्या अधिकार्यांनी नागरिकांना पाणी बचती विषयी मार्गदर्शन केले. तर सार्वजनिक ठिकाणची अनावश्यक असणारी नळ जोडणी कमी करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सध्या पावसाने पाठ फिरविल्याने निर्माण होत असलेली दुष्काळ जन्य परिस्थिती पाहता पालिकने विविध ठिकाणी पाणी बचतीचे फलक उभारले आहे. पालिका आयुक्तांनी केलेल्या सुरु केलेल्या जनजागृती मोहिमेला दिघा प्रभाग अधिकारी गणेश आघाव आणि पाणी खात्याचे अधिकारी कनिष्ठ अभियंता सचिन नामवाड, प्लबंर अशोक राठोड व मोहम्मद यांच्यासह संबंधीत अधिकारी वर्गाने प्रभाग समिती अंतर्गत असणार्या प्रभाग-२ मध्ये जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली. याविषषयी अधिक माहिती देताना प्रभाग अधिकारी आघाव म्हणाले की प्रभागातील झोपडपट्टी भागात काही ठिकाणी सार्वजनिक नळे आहेत. या ठिकाणी मोठया प्रमाणावर पाण्याचा अपव्य होत असल्याबद्ल त्यांनी नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळण्याबद्ल सूचना केल्या. काही ठिकाणी नळावर गाडया धुवणे, चाळी धुवण्याचे प्रकार सुरु होते. या प्रकारामुळे पिण्याचे पाणी वाया जात होते याबद्ल देखील विभाग अधिकार्यांनी नागरिकांना आणि गाडी चालकांना असा प्रकार करण्यास सक्त मनाई केली. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी असणार्या अनावश्यक नळ जोडण्या नागरिकांशी चर्चा करुन त्याला टाळे लावण्यात आले तर काही ठिकाणच्या जोडण्या कापण्यात आल्या. सध्या राज्य दुष्काळजन्य परिस्थिती असताना स्मार्ट सीटी असणार्या नवी मुंबईकर नागरिकांना पाणी बचत करुन सामाजिक उपक्रमात सहभागा विषयी नागरिकांना मार्गदर्शन केले. नागरिकांनी या अभिनव उपक्रमाचे स्वागत करत पाणी बचतीत सहभागी होऊन दुष्काळ निवारणासाठी सहकार्याची भूमिका घेतली.
=========
दिघा प्रभाग समिती अंतर्गत सर्व चाळी, इमारतीमध्ये होत असणार्या अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा यासाठी आगामी कालावधीत घरोघरी जाऊन जनजागृती केली जाणार आहे. त्याच बरोबर प्रभागातील विविध शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून माहितीपर पाणी बचत संवाद कार्यक्रम आणि जनजागृती रॅली काढण्याचा माझा मानस आहे.
-गणेश आघाव, दिघा प्रभाग अधिकारी.