मुंबई : राज्यातील अधिकृत लॉटरी योजनांची यादी महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाने जाहीर केली आहे. नोंदणी नसलेल्या व अनधिकृतपणे लॉटरी विक्री करणार्या प्रवर्तकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाने कळविले आहे.
अधिकृत यादीत आयुक्त, महाराष्ट्र राज्य लॉटरी (सोडत संख्या २१), लोटस मार्केटिंग, बोडोलँड प्रा.प. (आसाम), (सोडत संख्या १४), लोटस मार्केटिंग, मिझोराम (सोडत संख्या १), सेरेनिटी ट्रेडस्, गोवा (सोडत संख्या १), सेरेनिटी ट्रेडस्, गोवा (सोडत संख्या १६१), सेरेनिटी ट्रेडस्, सिक्कीम (सोडत संख्या १४), सेरेनिटी ट्रेडस्, मिझोरम (सोडत संख्या २१), पॅन इंडिया नेटवर्क, सिक्कीम (सोडत संख्या ५६), पॅन इंडिया नेटवर्क, मिझोरम (सोडत संख्या १९), फ्युचर गेमिंग ड हॉटेल सर्व्हिसेस प्रा. लि, मिझोरम (सोडत संख्या १४) आदी प्रवर्तकांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य लॉटरी कर अधिनियम २००६ मधील कलम ७ नुसार राज्यात विक्री होणार्या लॉटरी योजनांच्या प्रवर्तकांनी आयुक्त, महाराष्ट्र राज्य लॉटरी यांच्या कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे.