‘नवी मुंबईचे ओबामा’ या नावाने ओळखल्या जाणार्या आमदार संदीप नाईकांची नवी मुंबई महापालिकेकडून ‘एक्झिट’ झाली असली तरी महापालिका कामगारांवर असलेल्या प्रेमापोटी ते सातत्याने कामगारांच्या सुविधा-समस्यांची ‘अपडेट’ घेत असतात. महापालिका प्रशासनात काम करणार्या मूषक नियत्रंण कामगारांच्या समस्येत आमदार संदीप नाईकांनी स्वत:हून लक्ष घालण्यास सुरूवात केल्यामुळे हलाखीचे जीवन जगणार्या मूषक नियत्रंण कामगारांच्या जीवनात लवकरच आनंदाची पहाट येण्याचे संकेत निर्माण झाले आहेत. आमदार संदीप नाईकांचा श्वासच जणू काही नवी मुंबईच्या विकासाप्रती समर्पित झालेला पहावयास मिळत आहे. महापालिका, एमआयडीसी, सिडको, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कामगार सर्वच ठिकाणी आमदार संदीप नाईकांचे बारीक लक्ष असते. ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार असतानाही संदीप नाईकांनी दिघा ते बेलापुरच कार्यक्षेत्र जनसेवेकरता केंद्रीत केल्याने आजही व्हाईट हाऊस असो वा बालाजीचा तळमजला वाशी ते बेलापुरदरम्यानच्या नागरिकांचा गराडा संदीप नाईकांसभोवताली हमखासपणे पहावयास मिळतोच. मूषक नियत्रंण हा कामगार तसा महापालिका प्रशासनातील दुर्लक्षितच कामगार! उंदीर मारणे म्हणजे कमीपणाची नोकरी, त्यांना राजकीय ‘गॉडफादर’ नसल्याने त्यांच्या समस्यांना वाचा फोडली जातच नव्हती. तिसर्या महापालिका सभागृहात कार्यरत झाल्यावर आमदार संदीप नाईकांच्या अभ्यासू प्रवृत्तीमुळे महापालिकेच्या प्रशासकीय कारभाराची आणि कामगारांच्या समस्या-सुविधांची नस त्यांना जाणता आली. तळागाळातल्या माणसाशी संपर्क ठेवल्याने इंत्यभूत माहिती मिळते हे तंत्र संदीप नाईकांना अल्पावधीत अवगत केल्याने आजही श्रमिकांशी, बहूजन वर्गाशी, गोरगरीबांशी संदीप नाईकांचा जवळचा भावनिक संबंध प्रस्थापित झाला आहे. महाराष्ट्रात मोदी लाट असतानाही ऐरोली मतदारसंघात संदीप नाईकांच्या तटबंदीला मोदी लाट काही करू शकली नाही, त्याचे एकमेव कारण म्हणजे संदीप नाईकांच्या पाठीशी असणारा आजही तळागाळातील जनाधार हेच होय. संदीप नाईकांनी महापालिकेतून ‘एक्झिट’ घेत विधानभवनात ‘एंट्री’ केली असली तरी नवी मुंबईतील कामगार क्षेत्राशी व बहूजन वर्गाशी असलेली त्यांनी आपली नाळ तुटू दिली नाही. मूषक नियत्रंण कामगारांना सुरूवातीच्या काळात अवघा ५ हजार रूपये मासिक पगार होता. मूषक नियत्रंण कामगार महागाईच्या काळात जगणार कसा? आपला संसार अवघ्या पाच हजार रूपयांमध्ये चालविणार कसा? हे दु:ख जाणले ते फक्त आमदार संदीप नाईकांनीच. महापालिका प्रशासनाशी पाठपुरावा करून, त्यांना वस्तूस्थिती निदर्शनास आणून देवून त्यांचा पगार सफाई कामगारांच्या तोडीस तोड देणे आमदार संदीप नाईकांनी महापालिका प्रशासनाला भाग पाडले. आज मूषक नियत्रंण विभागात जितके कामगार कार्यरत आहेत, त्या सर्वांना आपले वेतन केवळ आमदार संदीप नाईकांमुळेच वाढल, याची जाणिव आहे. आज पुन्हा एकवार मूषक नियत्रंण कामगारांची ससेहोलपट सुरू आहे. कंत्राटदारांकडून पर्यायाने महापालिका प्रशासनाकडून दोन ते तीन महिने विलंबाने पगार सुरू आहे. रात्रीच्या वेळी मूषक नियत्रंण कामगार केवळ एका हातात काठी आणि एका हातात बॅटरी घेवून उंदीर मारण्याचे काम करत आहेत. त्यांच्या हातात ग्लोव्हज नाही वा अन्य सुविधा नाही, हे आमदार संदीप नाईकांनी जवळून पाहिलेले आहे. आमदार संदीप नाईक हे खर्या अर्थांने नवी मुंबईचे युवराज आहे. रात्री-अपरात्री ते एकटेच वाहन घेवून नवी मुंबईची पाहणी करतात, स्वत:च्या डोळ्यांनी समस्यांची पाहणी करतात. गेल्या काही दिवसापासून मूषक नियत्रंण कामगार कामावर येत आहेत, हजेरी लावत आहेत, पण काम करत नाहीत याचीही माहिती आमदार संदीप नाईकांना निश्चितच असणार. पोटाला अन्न नाही, वेळेवर पगार नाही या तणावात मूषक नियत्रंणचा कामगार आला दिवस ढकलत आहे. पगार नाही व सुविधाही नाही. दोनच दिवसापूर्वी नवी मुंबईचे शिल्पकार असणार्या लोकनेते ना. गणेश नाईकांचा वाढदिवस बावखळेश्वर मंदीराच्या प्रांगणात उत्साहाने साजरा झाला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील रथी-महारथी मंडळी दादांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करून होती. त्याचवेळी बावखळेश्वर मंदीराच्या प्रागंणात आमदार संदीप नाईक हे मात्र मूषक नियत्रंण कामगारांशी चर्चा करण्यात व्यस्त होते. त्या कामगारांनी मांडलेल्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या. आमदार संदीप नाईकांनी आपल्या समस्यांमध्ये लक्ष घातल्याने वेतनास होणारा नेहमीचा विलंब, अपुर्या सुविधा, आरोग्यविषयक प्रश्न आदींचे लवकर निवारण होवून आमदार संदीप नाईकांमुळे आपल्या आयुष्यात पुन्हा एकवार ‘सुखदायी पहाट’ उगविणार असल्याचा आशावाद मूषक नियत्रंण विभागातील कामगारांकडून व्यक्त केला जावू लागला आहे. तळगाळातील कामगारांशी आमदार संदीप नाईकांचा थेट सुसंवाद असल्याने त्यांना ‘ग्रासरूट’च्या समस्या व जीवनमान समजणे सोपे जाते आणि तेथूनच खरा हद्याला भिडणारा संपर्क व न तुटणारे एक नाते निर्माण होते. यातूनच आमदार संदीप नाईकांच्या कार्यप्रणालीला नवीन साज चढलेला पहावयास मिळतो. मूषक नियत्रंणच्या कामगारांसाठी आमदार संदीप नाईकांनी केलेले ठोस कार्य लवकरच नवी मुंबईकरांना पहावयास मिळेल असे खुद्द आता मूषक नियत्रंणच्या कामगारांकडून बोलले जावू लागले आहे.