* २०० कोटींची पायाभूत विकास कामांची सुरूवात मोठ्या प्रमाणावर विज सूधारणा
** आमदार निधीतून नागरी सुविधा नागरीक आणि शासकीय अधिकार्यांना एकाच व्यासपीठावर आणून समस्यांची उकल करणारा जनसंवाद कार्यक्रम विधानसभेत लक्षणिय कामगिरी
नवी मुंबई : आमदारपदाच्या पहिल्या वर्षात आमदार संदीप नाईक यांनी मतदार संघात अनेक नविन विकासकामांची पायाभरणी केली असून नविन नागरी सुविधांचे निर्माण केले आहे. पायाभूत सुविधांची २०० कोटींची कामे सुरु झाली आहेत. तर विज विषयक सुधारणा मोठया प्रमाणावर सूरु आहेत. या अंतर्गत नविन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यशस्वी विज वाहिण्या टाकण्यात येत आहेत. नवी मुंबईच्या जिव्हाळयाच्या प्रश्नांची सोडवणूक करीत असताना विधानसभेत लक्षणीय कामगिरी केली आहे. जनतेच्या थेट संपर्कात राहून प्रभागदौरे, शासकीय बैठका, पाहणीदौरे या उपक्रमांच्या माध्यमातून समस्यांचे निवारण करीत आहेत. मागण्यांच्या पुर्ततेसाठी सनदशीर मार्गाने प्रयत्न करीत असतानाच आंदोलनांच्या माध्यमातून संघर्षरत राहिले. शासकीय अधिकारी आणि जनता यांना एकाच व्यासपिठावर आणून नागरी समस्यांची उकल करणारा जनसंवाद हा अभिनव उपक्रम देखील त्यांनी यावर्षी सुरु केला आहे. आमदार संदीप नाईक यांच्या वर्षभराच्या कामगिरीवर टाकलेला हा प्रकाशझोत.
**पायाभूत सुविधांची निर्मिती २०० कोटींची कामे सुरु
स्मार्ट सिटीकडे झेपावणार्या नवी मुंबई शहरात पायाभूत सुविधांचे जाळे पसरले पाहिजे यासाठी आमदार नाईक यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत. एमएमआरडीए कडे पाठपुरावा करुन ठाणे-बेलापूर मार्गावर दोन उडडाणपूल आणि महापे येथे एक भुयारी मार्ग अशी कामे सुरु करुन घेतली आहेत. ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतुकीचा वाढता ताण पहाता आणि या रस्त्याची ठाणे, भिवंडी, पनवेल आणि पुढे पुणे भागाबरोबर असलेली कनेक्टीव्हिटी पाहता हे उडडाणपूल आणि भुयारी मार्ग गतीमान आणि सुरळीत दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहेत.
** शीळ-महापे रस्त्याची दुरुस्ती
शीळ-महापे रस्त्यावर मोठया प्रमाणावर खडडे पडले होते. या रस्त्याचा विषय आमदार नाईक यांनी विधानसभेत मांडल्यानंतर या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण तर झालेच शिवाय या रस्त्यावर एमएमआरडीएने उडडाणपूल देखील बांधला आहे. त्याचबरोबर पाठपुरावा करुन अडवली-भुतवली रस्त्याचे देखील रुंदीकरण आणि कॉंक्रीटीकरण करुन घेतले. या रस्त्यावर देखील उडडाणपूल बांधण्यात येतो आहे.
** ऐरोली रेल्वे स्थानकासमोर स्कायवॉक
ऐरोली रेल्वे स्थानकासमोरुन ठाणे-बेलापूर रस्ता ओलांडून रस्त्याच्या पलिकडे असणार्या आय.टी. कंपन्यांमध्ये रोज हजारो नोकरदार जात असतात. मात्र रस्ता ओलांडताना या ठिकाणी अपघात होत होते. नागरिकांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा यासाठी एमआयडीसीकडे पाठपुरावा करुन आमदार नाईक यांनी स्कायवॉक मंजुर करुन घेतला. या स्कायवॉकचे काम देखील सुरु झाले आहे.
** पाहणी दौर्यांमधून प्रश्नांची तड
नागरिकांशी थेट संपर्क साधून नागरी समस्या निवारण करण्याची आमदार नाईक यांची कार्यपध्दती आहे. त्यानुसार पहिल्या वर्षात त्यांनी नियमितपणे पाहणीदौरे आयोजित केले.
पटणी रोड येथील दौर्यानंतर या रस्त्यावरील खडडे बुजविण्यात आले. या रस्त्याचे लवकरच डांबरीकरण होणार असून हा रस्ता नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्तावही एमआयडीसीने तयार केला आहे.
मतदारसंघातील विविध भागांत पावसाळीपूर्व दौरे काढून आमदार महोदयांनी या कामांना गती दिलेली आहे. सायन-पनवेल मार्गाचा पाहणीदौरा केल्यानंतर एस.के.व्हिल्स समोरील रस्त्यावरील खडडे त्वरीत बुजविण्यात आले.
** घणसोली पामबीच मार्गवर आमदार निधीतून जॉगिंग ट्रॅक, सेंट्रल पार्कमधील योगा सेंटरसाठी आमदार निधी
ऐरोलीत साकारलेल्या जॉगिंग ट्रॅकच्या धर्तीवर घनसोली पामबीच मार्गावर आमदार नाईक यांच्या आमदारनिधीतून जॉगिंग ट्रॅक उभारण्यात येणार आहे. घनसोलीत साकार होत असलेल्या सेंट्रल पार्कसाठी आमदार नाईक यांनी राज्य शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करुन घेतला आहे.
** विधानसभेत लक्षवेधी कामगिरी
एकीकडे जनतेच्या थेट संपर्कात राहून त्यांच्या समस्या निवारणे तसेच मतदारसंघात विविध सोयी सुविधांचे निर्माण करणे अशी कार्यप्रणाली सुरु ठेवतानाच दुसरीकडे विधानसभेत संसदीय आयुधांचा वापर नवी मुंबईच्या प्रश्नांना आमदार संदीप नाईक यांनी जोरदार वाचा फोडली आहे.
** तारांकीत प्रश्न
आमदार नाईक यांनी तारांकीत प्रश्न, लक्षवेधी सुचना, औचित्याचे मुददे, अशासकीय ठराव इत्यादींच्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास महत्वाचे प्रश्न आणून दिले. ज्यामुळे शासनाला त्या विषयांवर काय कार्यवाही केली त्याची माहिती द्यावी लागली तसेच पुढील कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन द्यावे लागले.
माथाडी कामगारांना घरांची वाटप प्रक्रीया सुरु झाली. स्थानिकांना स्थानिक कारखाण्यात नोकर्या प्राप्त झाल्या. सिडको कार्यालयात कंत्राटीं कामगार म्हणून मागासवर्गीय युवकांना नोकर्या प्राप्त झाल्या. बेलापूर येथील न्यायालयाच्या इमारतीसाठी पुढील दोन वर्षात उर्वरित निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही मिळाली. महापे ते विक्रोळी खाडीपूलाच्या फिजिबिलीटी रिपोर्टचे काम गतीमान करण्यात आले. नविन पनवेल येथे मुस्लीम बांधवांच्या दफनभूमीसाठी भुखंड उपलब्ध करुन देण्यात आला. पनवेल ताल्ाुक्यातील आदीवासी बांधवांच्या ७८३ घरांचे दावे मंजुर करण्यात आले. आरोग्य विभागातील डॉक्टर आणि कर्मचार्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली. कारखाण्यांसाठी असलेली विजेची सबसिडी पूर्ववत करण्यात आली. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीसाठी व भाऊबीज भेटीसाठी अर्थसंकल्पात पुरवणी मागणी सादर करण्यात आली. २०१३ पूर्वीच्या गावठाणातील बांधकामांवर सिडकोने अन्याय करणारी कारवाई आंरभली होती. त्याविरोधात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार नाईक यांनी या विषयी मांडलेल्या लक्षवेधी सुचनेवर उत्तर देताना दिले. नवी मुंबईत पोलीस चौक्यांची संख्या वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील रहिवाशांना हक्काचे घर मिळावे यासाठी एसआरए योजना राबविण्याची मागणी आमदार नाईक यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे. लिज होल्ड जमिनी फ्री होल्ड करण्याबाबत त्यांच्या प्रयत्नांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सुशिक्षित बेरोजगार आणि मागासवर्गीयांसाठी सिडको आणि एमआयडीसीमधील सेवेसाठी वयोमर्यादा वाढविण्यावर शासनाने योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
** शासकीय बैठकांमधून प्रश्नांची सोडवणूक
नविन क्लस्टरमधील त्रुटी सिडकोला अवगत केल्या. नवी मुंबईकरांसाठी टोलमुक्ती आणि गरजेपोटी बांधलेल्या घरांना सिडकोने बजावलेल्या नोटीसींविषयी विधान परिषदेचे उपसभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात आमदार नाईक यांच्या विनंतीवरुन बैठक पार पडली. नविन क्लस्टर योजनेत अनेक त्रुटी असल्याचे आमदार नाईक यांनी निदर्शनास आणून दिले असताना या विषयी ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी दिले.
** ऐरोली टोकनाका लवकरच टोलफ्री
ऐरोली आणि वाशी येथील टोल नाके बंद करावेत या मागणीसाठी आमदार नाईक यांनी जनआंदोलन छेडले. मुख्यमंत्री फडणवीस यांना लेखी निवेदन दिले. त्याला यश आले असून मुंबईच्या एंन्ट्री पॉइंटवर असलेले सहा टोलनाके टोल फ्री होणार आहे त्यामध्ये ऐरोली टोलनाक्याचा समावेश असल्याचे उत्तर या बैठकीत एमएसआरडीसीचे अधिकारी श्री रामचंद्रन यांनी दिले.
** वाहतुककोंडी फोडण्यासाठी पुढाकार
नवी मुंबई शहरातील वाहतुककोंडीची समस्या सोडविण्यासाठी आमदार नाईक यांनी वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अरविद साळवे याची भेट घेतली. या भेटीनंतर विभागवार पोलीस अधिकार्यांबरोबर समन्वय साधून उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.
** सिडकोनिर्मित धोकादायक इमारती पुनर्विकासाच्या योजनेत त्रुटी
नवी मुंबईतील सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींचा पुनर्विकास २.५ एफएसआयच्या माध्यमातून करण्याचा निर्णय तत्कालिन आघाडी सरकारने घेतला होता. मात्र युती सरकारने अधिसूचने व्दारे आणलेल्या योजनेत त्रुटी आहेत. त्या त्रुटीचे निराकरण करुन रहिवाशांच्या हिताची सर्वसमावेश योजनेसाठी आग्रही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारताच त्यांची भेट घेतली आणि नवी मुंबईचे प्रलंबीत प्रश्न सोडवीण्याची मागणी केली.
** साथ रोग नियंत्रण आढावा
शहरातील आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे असे दिसताच तत्कालिन पालिका आयुक्त आबासाहेब जर्हाड यांची भेट घेवून आमदार नाईक यांनी उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या. या नंतर शहरात मोठया प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाय योजून जनजागृती करण्यात आली.
** पावसाळीपूर्व कामांना गती
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील आमदार नाईक यांनी पावसाळी पूर्व कामांचा पाहणीदौरा करुन प्रभागनिहाय पालिकेचे आणि इतर प्राधिकरणाचे संबधित अधिकारी यांच्या प्रभागनिहाय बैठका घेवून ही कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना त्यांना दिल्या.
** रिक्षा चालकांना न्याय दिला
रिक्षा परवान्यांसाठीची १०वी उत्तीर्णची अट काढून त्याऐवजी ८वी उत्तीर्णची अट ठेवावी या मागणीसाठी आमदार नाईक यांनी परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांची प्रथम भेट घेतली त्यानंतर राज्याच्या परिवहन मंत्रयांना देखील लेखी निवेदन दिले. या पाठपुराव्यानंतर १०वी उत्तीर्णची अट काढून टाकण्यात आली असून जुने परवाने पुन्हा देण्याचा निर्णय देखील शासनाने घेतला आहे.
** आंदोलने आणि यश
नवी मुंबईतील प्रश्नांची सोडवणूक करताना सनदशीर मार्गांचा अवलंब करण्याबरोबरच आंदोलनाच्या माध्यमातून संबधीत यंत्रणेला आमदार नाईक यांनी दणके दिले आहेत.
ऐरोली, वाशी आणि खारघर येथील टोलमुक्तीसाठी धडक मोर्चा काढल्यानंतर आणि शासकीय पातळीवरील सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर टोलमुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
महावितरणच्या अनागोंदी कारभाराविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून महावितरणच्या कार्यालयावर कंदील मोर्चा काढण्यात आला. आंदोलनाचा शॉक देताच वाढीव वीजबिले दुरुस्त करण्याची कार्यवाही महावितरणने सुरु केली आहे.
नवीन क्लस्टर योजनेत त्रुटी असल्याने सर्वसमावेशक गावठाण योजनेसाठी सिडकोवर धडक मोर्चा काढून या प्रश्नी विधानसभेत त्यांनी आवाज बुलंद केल्यानंतर सर्वसमावेशक गावठाण योजनेसाठी कार्यवाही सुरु झाली आहे.
एमआयडीसीच्या जागेवर राहणार्या रहिवाशांनी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी एमआयडीसी कार्यालयावरम मोर्चा काढाला होता. या रहिवाशांसाठी लोकहितकारी योजना राबविण्याची मागणी आमदार नाईक यांनी या मोर्चाप्रसंगी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देवून एमआयडीसीच्या जागेवरील रहिवाशांसाठी एसआरए योजना राबविण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दुष्काळग्रस्त शेतकर्यांना मदत मिळावी यासाठी देखील आमदार नाईक यांनी आघाडीच्या आमदारांसोबत विधानभवनात आंदोलन केले. त्याची देखील माहिती देण्यात आली आहे.
** आमदारनिधीतून नागरी कामांना सुरुवात
आमदार नाईक यांच्या आमदार निधीतून विविध नागरी सुविधांची कामे आणि विकास प्रकल्पांची पायाभरणी झाली आहे. अनेक सुविधा निर्माण झाल्या आहेत.
ऐरोली डी मार्ट येथे जॉगिंंग ट्रॅकच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. घणसोली पामबीच मार्ग येथे जॉगिंग ट्रॅकची निर्मिती केली जाणार आहे. घणसोलीत सेंट्रल पार्कमध्ये योगा सेेटर सुरु करण्यासाठी आमदार नाईक यांनी आमदारनिधी दिला आहे. कोपरखैरणेतील प्रभाग ३३ आणि ३४मध्ये आपेन जिमचे निर्माण केले आहे. कातकरी पाडा येथे शौचालयासाठी आमदारनिधी देण्याचे जाहिर केले आहे.
** मोठ्या प्रमाणावर वीज सुधारणा १९५ ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर
आमदार संदीप नाईक यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, लेखी निवेदने दिल्याने, वेळोवेळी बैठका घेतल्याने दिघा, ऐरोली, रबाळे, घनसोली, कोपरखैरणे, तुर्भे, वाशी एमआयडीसी विभागांतील विविध प्रभागांमध्ये नादुरुस्त ट्रान्सफार्मर बदलून त्या जागी नवीन ट्रान्सफार्मर बसविले जात आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर २ या योजनेअंतर्गत महावितरण कंपनीने ही कामे सुरु केली आहेत.
आमदार नाईक यांनी शहरातील वीज समस्यांचा सविस्तर अभ्यास त्यांनी केला होता. या समस्या सोडविण्यासाठी नवी मुंबईत वीज अधिकार्यांबरोबर वेळोवेळी बैठका घेतल्या होत्या. २७ मे २०१४ रोजी त्यांनी वाशी विभागाचे अभियंता थोरात यांच्याबरोबर बैठक घेवून वीज समस्यांचा एक लेखी आराखडाच त्यांना सादर केला होता. नादुरुस्त डीपी बॉक्स, जुनाट केबल आणि उघडया केबलमुळे होणार्या शॉर्ट सर्कीटच्या आणि विजेचा धक्का लागण्याच्या दुर्घटना, नादुरुस्त ट्रान्सफार्मर, घरांवर लटकणार्या वीज वाहिन्या, वारंवार खंडीत होणार्या वीज पुरवठ्यामुळे घरांतील उपकरणे बिघडणे इत्यांदी समस्यांची सविस्तर माहिती त्यांना दिली होती. त्यांच्या या अविरत प्रयत्नांमुळे इन्फ्रा २ योजनेअंतर्गत विद्युत सुधारणांची कामे सुरु झाली आहेत. आधुनिक नवी मुंबईतील वीज व्यवस्था मजबूत राखण्यासाठी आमदारकीच्या पहिल्या टर्मपासून ते आता दुसर्या टर्ममध्ये देखील प्रयत्नशील आहेत.
** पर्यटनाला चालना
गवळीदेव आणि सुलाईदेवी ही दोन नवी मुंबईकरांची श्रध्देची ठिकाणे आहेत. त्याबरोबर ती निसर्गाने नटलेली देखील आहेत. या दोन स्थळांना उत्कृष्ट पर्यावरणस्थळे म्हणून विकसीत करण्यासाठी आमदार नाईक प्रयत्नशील आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने या दोन्ही ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेकडे त्यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे पालिकेकडून २.८४ कोटी रुपयांचा निधी मंजुर झालेला असून त्यापैकी १ कोटी रुपयांचा निधी पालिकेकडून वन विभागाकडे वर्ग देखील झाला आहे.
१५ लाख रुपयांच्या आमदारनिधीतून गवळीदेव या पर्यटन स्थळ परिसरातील ऐतिहासिक विहीरीची डागडूजी केली जाणार आहे. तसेच आमदार नाईक यांच्या आमदारनिधीतून सुलाईदेवी येथे विद्युतदिवे बसविण्यात येणार आहेत.
** जनसंवाद उपक्रम
एकाच व्यासपिठावर सर्व शासकीय आणि निमशासकीय खात्यातील अधिकार्यांना जनतेसमोर एकत्र नागरी समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आमदारकीच्या दुसर्या टर्ममध्ये आमदार नाईक यांनी जनसंवाद हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. पहिला जनसंवाद ऐरोली विभागासाठी पार पडला. या उपक्रमास नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. विविध विभागांशी संबधीत ५०० पेक्षा अधिक निवेदने प्राप्त झाली. १८ विषयांवर चर्चा झाली. जनसंवाद उपक्रमात प्राप्त निवेदनांवर संबधीत खात्याच्या अधिकार्यांकडून कार्यवाही करुन घेतली जाते या संबधीचा अहवाल त्याच्याकडून प्राप्त होताच काय कार्यवाही करण्यात आली त्याची माहिती संबधीत निवेदनकर्त्याला देण्यात येते. जनसंवाद हा उपक्रम विभागवार आयोजित करण्याचा मानस आमदार नाईक यांनी व्यक्त केला आहे.
** बेरोजगारांसाठी आशेचा किरण रोजगार मेळावा
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील आमदार नाईक यांनी बेरोजगार युवक आणि युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. बेरोजगारी ही तरुणांना निराशेच्या गर्तेत नेणारी गंभीर समस्या असून नवी मुंबईतून ही समस्या कमी करण्यासाठी ते या मेळाव्यांचे दरवर्षी आयोजन करीत असतात. या वर्षी ऐरोली येथे हा मेळावा पार पडला. त्यांच्या आवाहनानुसार विविध क्षेत्रातील ६५ कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतला. सुमारे ३ हजार ८०० नोकरीइच्छूक उमेदवारांनी हजेरी लावली. त्यापैकी १८५२ उमेदवारांची रोजगारासाठी निवड करण्यात आली. उर्वरित उमेदवारांना रोजगार प्राप्तीसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.
** बोर्डाच्या धर्तीवरील सराव परिक्षा
एसएससीच्या मुख्य परिक्षेला विश्वासाने सामारे जाण्यास विद्यार्थ्याना तयार करणारी तसेच त्यांच्या निकालाची टक्केवारी वाढविणारी बोर्डाच्या धर्तीवरील एसएससी सराव परिक्षेचे आयोजन आमदार नाईक हे दरवर्षी करीत असतात. या वर्षी ही परिक्षा २० डिसेंबर २०१४ ते ११ जानेवारी २०१५ या कालावधीत पार पडली. १३ हजार ८०० विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिली. मराठी, इंग्रजी, सेमी इंग्रजी आणि हिंदी माध्यमातून परिक्षा घेण्यात आली. दहावीची परिक्षा बाहेरुन देणार्या विद्यार्थ्यांना देखील ही परिक्षा देण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. प्रत्येक माध्यमातील पहिल्या तीन क्रमांकप्राप्त विद्यार्थ्यांना आयपॅडचे परितोषिक देवून सन्मानित करण्यात आले. ज्यांना महागडे कोचिंग क्लासेस लावता येत नाहीत अशा सर्वसामान्य वर्गातील आणि पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही सराव परिक्षा जणू वरदानच ठरली आहे.
** पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण
शहराचा झपाटयाने विकास होत असताना नागरिकांना मोकळा आणि शुध्द श्वास घेता यावा यासाठी आमदार नाईक गेली अनेक वर्षे वृक्षारोपणासारख्या पर्यावरणपुरक मोहिमांमधून शहरातील नैसर्गिक संप्पनता वाढवित आहेत. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील ग्रीन होप या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जागतिक पर्यावरणदिनी या मोहिमेच शुभारंभ केला आहे. ग्रीन होपच्या वतीने वृक्षरोपांचे मोफत वितरण सुरु असून त्या त्या भागात निसर्गप्रेमी नागरिकांच्या सहभागाने ही मोहिम सुरु आहे.