नवी मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेरूळ उपविभागप्रमुख मनोज चव्हाण आणि साई जनसेवा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वस्त दरात तेल वाटप कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून पहिल्याच दिवशी अवघ्या ४ तासात ३५०० लीटरपेक्षा अधिक तेलाची विक्री झाली.
नेरूळ सेक्टर २ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाखाली गुरूवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी सांयकाळी ६ ते १० या वेळेमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सन फ्लॉवर सनरिच या तेलाची अवघ्या ७५ रूपये दराने यावेळी शिवसेनेकडून विक्री करण्यात आली.
या कार्यक्रमास शिवसेनेच्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे, शिवसेना विभागप्रमुख गणेश घाग, शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे, महिला विभाग संघठक सौ. सत्वशीला जाधव, युवा सेना विभाग अधिकारी रमेश शिवतरकर, वाई तालुका संपर्कप्रमुख अशोक मुंगसे, शाखाप्रमुख राजेश पुजारी, माजी शाखाप्रमुख तुकाराम काळे, युवा सेना अधिकारी विशाल गुंजाळ यांच्यासह राजा भाऊ बोबडे, शरद पाजांरी, मंगेश शिवतरकर, प्रकाश वाघमारे, सुरेश मोरे, मंगेश शिवतरकर, अनिकेत भिलारे, निखिल मांडवे, साईश जाधव, ज्ञानेश्वर दळवी, अनुभव बेळे, सत्यम वेर्गुलेकर, सचिन धुमाळ, विकास म्हात्रे, गौतम शिवराळे, अमित म्हात्रे, आशिष गोंडूले, अमोल कोंडे, मंगेश पवार, दिपक काके आदि उपस्थित होते.
स्वस्त दरात उपलब्ध होणारे तेल खरेदी करण्यासाठी या कार्यक्रमात नेरूळ सेक्टर २,४,६,८,१० येथील महिला वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी आला होता. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सेक्टर २,४,८ मधील शिवसैनिक व साई जनसेवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.