नवी मुंबई : गणेशदादा भगत, किसमत भगत व रविंद्र भगत या नेरूळ गावातील त्रिमूर्तीने सामाजिक कामातून राष्ट्रवादी कॉंग्रेसची पक्षसंघटना बळकट करत जनाधार वाढविण्याचा विडाच उचललेला असल्याने सामाजिक कामात आक्रमकरित्या सहभागी होण्याची कोणतीही संधी भगत बंधू सोडत नसल्याचे आज पुन्हा एकवार पहावयास मिळाले. घरातील व्यक्तिचे अंत्यसंस्कार करून येत असतानाच विझलेली आग विझविण्यासाठी दु:खाचा कोसळलेला डोंगर बाजूला ठेवून भगत बंधू सहभागी झाल्याचे नेरूळवासियांना जवळून पहावयास मिंळाले.
नेरूळ गावातील बाळाराम भगत यांचे आज निधन झाले. भगत परिवारावर आज दु:खाचा डोंगरच कोसळला. बाळाराम भगत यांच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करून परत येत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत यांना आकाशात आगीचा धुर पहावयास मिळाला. त्यांनी तात्काळ याचा शोध घेत रविंद्र भगत व अन्य लोकांसमवेत आग लागलेल्या ठिकाणी धाव घेतली.
नेरूळ सेक्टर २८ येथील तुलसी सागर टॉवरसमोरील रिक्त मैदानावरील सुक्या गवताला आग लागली होती. गवत सुके असल्याने आग वाढत गेली. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांने अग्निक्षमन दलाला संपर्क करून बोलावून घेतले. अशावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेशदादा भगत, रविंद्र भगत व अन्य सहकार्यांनी अग्निमशमन दलाच्या जवानांसोबत आग विझविण्यात पुढाकार घेतला. घरातील व्यक्तिचे अंत्यसंस्कार करून येत असतानाच भगत बंधू आग विझविण्यात सहभागी झाल्याने नेरूळ पश्चिमेला भगत बंधूंच्या कार्याची चर्चेतून दखल घेतली घेतल्याचे पहावयास मिळत होते.