* शिवसेनेच्या आमदारांची अणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी
* अणेंच्या माफी मागणीवर शिवसेना ठाम
नागपूर : राज्याचे महाधिवक्ते श्रीहरी अणे यांच्याविरोधात शिवसेनेने दाखल केलेला हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी फेटाळला. मात्र याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना निवेदन करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले आहेत.
तत्कालीन महाधिवक्ता खंबाटा यांच्याविरोधात देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंग दाखल केला होता. तेव्हा खंटाबा यांनी माफी मागितल्याचा दावा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. मात्र खंबाटा यांनी माफी न मागितल्याचे विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले. त्यामुळं शिवसेनेच्या आमदारांनी अणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अणेंच्या माफीच्या मागणीवर शिवसेना ठाम आहे.
श्रीहरी अणे यांनी विदर्भाबाबत जनमत घ्यावे, असे म्हटले होते. याच्या पाठिमागे भाजप असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अणेंचा बोलवता धनी कोण, याची चौकशी करण्याची मागणी केली होती. तर शिवसेनेने अणे यांच्याविरोधात दंड थोपटत हक्कभंगाचा प्रस्ताव दिला. मात्र, तो फेटाळण्यात आला.