नवी मुंबई : अच्छे दिनची वाट पाहत असलेल्या जनतेला डाळी पाठोपाठ आता साखरेच्या दरवाढीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. यंदाच्या हंगामात साखरेचे उत्पन्न कमी होणार असून मगणीच्या तुलनेत पुरवठा कमी होण्याची चिन्ह आहेत. साखरेचे कमी होत असलेले उत्पन्न, दुष्काळामुळे कमी होत असलेले उसाचे उत्पन्न, कारखानदार अणि शेतकार्यांमध्ये सुरू असलेला एफआरपीचा वाद याचा फटका साखर उद्योगाला बसला आहे.
गेल्या पाच महिन्यात साखरेच्या दरात विक्रमी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यात प्रति क्विंटल १८०० रूपये असलेला साखरेचा दर २९०० रूपये प्रति क्विंटलवर पोहचला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात साखरेची मागणी वाढेल पण कमी उत्पादन होत असल्याने दरात वाढ होवून सर्वसामान्यांना साखर महाग होईल अशी भीती साखर संघाच्या वरिष्ठ अधिकार्यांने व्यक्त केली आहे.
गेल्या गाळप हंगामात २०१४ -१५ या वर्षात ९३० लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले होते. तेच उत्पादन २०१५-१६ सालात घटून ७६० लाख मेट्रीक टनावर येण्याची दाट शक्यता आहे. तर त्या पुढच्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०१६-१७ साली साखरेच्या उत्पन्नात ६०० लाख मेट्रीकटना पर्यंत घट होवू शकते. या साखरेच्या उत्पादनातील हा चढ-उतार पाहता साखरेचा तुटवडा निर्माण होणार आहे हे निश्चित असल्याचे ही साखर संघाच्या अधिकार्यांनी सांगितले.
साखरेचे दर प्रति क्विंटर तब्बल ११०० रूपयांनी वाढले आहेत. या वाढलेल्या दराचा लाभ थेट व्यापार्यांच्या खिशात जाणार आहे. व्यापारात एक सूत्र असे आहे की, जेव्हा व्यापार्यांना लाभ होतो तेव्हा सामान्यांना त्याचा फटका बसतो. अशीच काहीशी स्तिथि पुढच्या काळात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. करखान्यांना आपला लाभ कर्ज फेडीवर खर्च होणार असल्याने कारखान्यांच्या ताळेबंदीवरही त्याचा परिणाम आत्तापासूनच दिसून येत आहे.
कारखान्यांना या आर्थिक वर्षात ११०० कोटी रूपयांचे कर्ज फेडायचे आहे. राज्यात सध्या १७० साखर कारखाने सुरू आहेत. त्या पैकी तब्बल ६० टक्के कारखाने हे तोट्यात आहेत. दुष्काळामुळे २० ते २५ टक्के उत्पादन कमी झाले आहे. राज्यातील करखान्यात दीड लाख कामगार काम करत आहेत. या परिस्थितीवर सरकारने लक्ष घावून वेळीच उपाययोजना करण्याची वेळ आली असून यावर उपाय योजना करण्यात उशीर झाल्यास ग्रामीण भागातली आर्थिक स्थिति कोलमडून जाईल अशी भीती ही वर्तवण्यात येत आहे.