सहा – सात महीन्याभरापुर्वी एका संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त एक वक्त्या म्हणून श्रेया सुधिर यांना आमंत्रित करण्यात आले होते. तिथे त्यांनी ‘स्त्रीवादा’ विषयी काही वक्तव्ये मांडली. स्त्रियांची सामाजिक, राजकीय स्थिती मांडली. त्याचनंतर, त्यांनी सामर्थ्य फॉंडेशनबद्दल थोडक्यात माहिती दिली.
तेव्हापासून मी त्यांच्या संपर्कात राहिलो. ‘स्त्रीवादा’विषयी मी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. जिथे जिथे स्त्रियांवर अन्याय – अत्याचार, पडीत बाजू आली की मन नेहमीच पेटून उठते. त्याच धर्तीवर, श्रेया ताई, त्यांचे काम, सामर्थ्य फॉंडेशन, याची दखल घ्यावीसी वाटली. त्यातून केलेली त्यांच्याशी चर्चा, मी पुढे विस्तारित रुपात देत आहे.
ताईंचे बालपण तसे कष्टाचेच. बाबा दारू प्यायचे. आई ‘एम’ वॉर्ड मधील अपनालय मध्ये कामाला होत्या. तिच्याच तुटपुंज्या पगारात कसे बसे घर चालायचे. शाळा करीत घरात हातभार लावत होत्या. शाळेतून आल्यावर जिथे राहत होत्या, तिथेच लादी पुसण्याचे काम करून ,आपल्याच वयाच्या इंग्रजी शाळेत शिक्षण घेणार्या मुलांना मराठी आणि हिंदी शिकवणी घेत, मधल्या सुट्टीत बाबांनी तयार केलेल्या कंबरेच्या पट्ट्यांचे स्टाफरुम मध्ये जाऊन विक्री करणे, ही कामे करून ताईने आईला हातभार लावला. यात ताईला कधीच कमीपणा वा लाज वाटली नाही. उलट मोठ्या गर्वाने सांगता सांगता पटकन तिच्या डोळ्यातून अश्रू घसरले. आई ‘अपनालय’मध्ये असल्यामुळे साहजिकच महिलांच्या दुर्बलतेच्या कथा तिला कळायच्या. कानावर पडायच्या. तिथेच ताईची दुर्बल – पिडीत महिलांसाठी असलेली आत्मीयता तयार झाली. तिथून पुढे सुरु झाला प्रवास सामर्थ्य फॉंडेशनचा.
ताईने ‘बीएसडब्ल्यू’ला ऍडमिशन घेतले. कॉलेजला जायला सुद्धा नीटनेटके कपडे होते जुने असायचे पण त्यातही त्याचा स्वाभिमान जुने असले तर काय झाले . सन २००० ला ‘बीएसडब्ल्यू’ पुर्ण झाले. पुढे ‘एमएमडब्ल्यू’ला ऍडमिशन घेतले, ते ही पुर्ण केले. हे दोन्हीही कोर्सेस करताना प्रचंड हाल, फी भरतानाची मारामारी, घरचे प्रॉब्लेमस् यांतून सावरताना तिची कमालीची कसरत व्हायची. आता राहिला प्रश्न लग्नाचा. खरं तर, ताईला लग्न करायचे नव्हते कारण आईला व बहिणींना सावरणारी होती म्हणून दुसरं कारण म्हणजे स्त्रियांचे समोर होणारे हाल व त्यांची स्थिती. तरिही, एक स्थळ आलेच. सर्व हट्ट करु लागले की लग्न कर. ताईने त्या मुलाशी एकांतात सर्व परिस्थिती समजावून सांगितले. त्यांनीही तिला समजून घेऊन होकार दिला. तेव्हा ती लग्नाला तयार झाली. या प्रवासापर्यंत वडिलांनी पिण्याचे सोडून, इतर लोकांना दारू सोडविण्यासाठी मार्गदर्शन सुरु केले आजपर्यंत ते सुद्धा समाज परिवर्तनाच्या या लढार्ईत ताईबरोबर उभे आहेत त्याची आई आणि बाबा ताईची ताकद आहे.
लग्नानतर, काही वर्षे ताईने सामाजिक कामे तशीच सुरु ठेवली. दररोज नवीन नवीन पिडीत स्त्रियांशी भेटी होवू लागल्या. त्यांचे दु:ख जाणून घेताना काटा उभा राहायचा. ज्या ज्या महिला, तरुण मुली भेटायच्या त्यांच्या प्रत्येकीच्या वेग वेगळ्या समस्या असायच्या. कुणी आत्महत्या करायला जाताना मध्येच भेटलेल्या, कुणी सासरी छळाला कंटाळून जीव नकोसा झालेल्या, कुणी लहान वयातच अत्याचाराला बळी पडलेल्या, लग्नाचे आमिष दाखवून फसगत झालेल्या, काही तर अगदीच विचित्र मानसिकतेतून जात होत्या. त्या सर्वांना ताईने जीवदान दिले. आपलेसे केले. त्यांना नवीन आयुष्याची सुरुवात करून दिली. लग्नानंतर, स्वत:ची संस्था वगैरे नव्हती, त्यावेळी तिला या केसेस हाताळताना खूप मेहनत घ्यावी लागली. रात्री अपरात्री फोन कॉल्स, पोलिस स्टेशनस्, केसेसचा पाठलाग या सर्व गोष्टी ती हिमतीने करते. बहुतेक वेळा, तिने स्वत:च्याच घरातच या महिलांना व तरुणींना ठेवावे लागले, ते ही तब्बल एक एक वर्षभर किंवा त्याहून ही जास्त काळ ! त्या मुलींना, महिलांना छोट्या छोट्या कला शिकवल्या, काही प्रशिक्षणे दिली. ज्यातून त्या स्वत: काही वस्तू बनवू लागल्या. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचे प्रशिक्षणही ताईने दिले. त्या सर्व वस्तूंचे ताईंने प्रदर्शनही लावले होते. बहूतेक वेळा ती या वस्तू घेऊन पायपीट करीत विक्रीसाठी ही नेते. ताई, या वस्तू विकायला जाताना ट्रेन च्या गर्दीतून भली मोठी पाठीला बॅग लावून दिवस दिवस भर उन्हातून फिरून विकते. मिळालेले पैसे त्या मुलींना देते. त्यांना रोजगार व स्वाभिमान मिळवून दिला. अशावेळी ताईला सासरच्या मंडळीकडून शाबासकी नेहमी मिळाली. त्यांनीही तिला या कामात मदत केली. प्रत्येक प्रसंगावेळी ताईंचे मिस्टर सुधिर दादा नेहमीच खंबीरपणे तिच्या पाठीशी ऊभे राहिले. म्हणूनच ताईने तिचे नाव संतोषी वरून श्रेया ठेवले. कारण हे सर्व श्रेय ती सुधिर दादांना देते. पुढे तिने तिचे आडनाव सुधिर केले. सुधिरचे श्रेय म्हणजेच श्रेया सुधिर.
आता तिला स्वत:ची संस्था असण्याची गरज वाटू लागली. कारण बर्याच संस्था या पैसे उकळण्याच्या मार्गावर असतात. पण तिला पैसांपेक्षा या मह
लिांचे दु:ख मोठं वाटत होते. त्यांना स्व:ताच्या माणसांचे प्रेम, आपुलकी मिळवून द्यायची होती. त्यातूनच पुढे या महिलांसाठी लढणारी संस्था उदयास आली. सामर्थ्य फॉंडेशन. नावातच सर्व काही आले. या मुलींना, महिलांना सामर्थ्यवान करायचे, स्वत:च्या पायावर उभे करायचे, लैगिक शोषण, अन्याय, सासरचा छळ यांवर आवाज उठवणारी, जागृती, स्वयं रोजगार, स्वावलंबी बनणे, परत नवीन आयुष्य सुरु करायचे, हाच मुळ उद्देशाला धरुन ही संस्था निर्माण करण्यात आली. संस्था निर्माण करताना बर्याच अडचणी आल्यात. संस्थेचे एक छोटेसे ऑफिसही आहे. परत कामाला सुरुवात केली. बेलापूर जवळच्या आसपासच्या परिसरात महिलांना गृह उद्योग, टाकाऊ पासून वस्तू तयार करणे, बचत गट ताईने तयार केलेत. बर्याच कंपनीत, ऑफिसला मुलींचे, महिलांचे कॉन्सेलींग करणे, त्यांना धोका कसा ओळखायचा, कुठल्या परिस्थितीत काय निर्णय घ्यायचे, असे जागृतीचे उपक्रम ताई राबवत आहे. हे सर्व नि:शुल्क करीत आहे. कुठलाही मोबदला तिने कुणाकडून घेतला नाही.