दोन दशकात १४ इमारती कोसळल्या
१७५ लोकांचा गेला बळी
१३७ गंभीर जखमी
ठाणे : राज्य सरकार व महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षही ठाण्यातील धोकादायक ईमारतींच्या
समस्यांविषयी गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप ठाणेकरांकडून केला जात आहे. तीन हजाराहून अधिक धोकादायक
ईमारती असतानाही महापालिका तसेच राज्य सरकारच्या पातळीवर कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही.
ठाणे शहर स्मार्ट सिटी बनविण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या असल्या तरी या धोकादायक
इमारती स्मार्ट सिटीला काळीमा ठरण्याची भीती ठाणेकरांकडून व्यक्त केली जात आहे.
धोकादायक ईमारत दुर्घटनेमध्ये गेल्या २० वर्षात १७५ लोकांचा बळी गेला असून १३७ लोक गंभीर जखमी झाले
आहेत. या इमारत दुर्घटनावर ठोस उपाययोजना न झाल्यास दुर्घटना सत्र येत्या पावसाळ्यात पुन्हा सुरू होण्याची
दाट शक्यता आहे.
या तीन हजार धोकादायक इमारतींकडे प्रशासकीय व राजकीय स्तरावर होत असलेला कानाडोळा मृत्यूला आमत्रंण
देत असल्याचा आरोप ठाणेकरांकडून केला जात आहे.
अजून किती बळी हवेत !
१४ डिसेंबर १९९५ रोजी मुंब्रा येथील रशिद कंपाऊंड दुर्घटनेत २४ लोकांचा मृत्यू झाला. ७ नोव्हेंबर १९९८ रोजी
साईराज अपार्टंमेंट दुर्घटनेत १६ लोकांचा मृत्यू झाला. ४ एप्रिल २०१३ रोजी मुंब्रा येथील लकी ईमारत दुर्घटनेत ७४
लोकांचा मृत्यू झाला होता तर ६० लोक गंभीर जखमी झाले होते. गेल्या वर्षी नौपाडा येथील बी केबिन परिसरात
ईमारत कोसळल्याने १२ लोकांचा मृत्यू झाला होता.
कागदी घोडे नाचविण्याशिवाय अन्य प्रगती नाही
ठाण्यात वारंवार होणाऱ्या इमारत दुर्घटनामध्ये फक्त प्रशासकीय पातळीवर चर्चाच होते, पण कार्यवाही काहीही होत
नाही. दोन दशकामध्ये १७५ लोकांचा मृत्यू होवूनच ठोस उपाययोजनाच झालेली नाही. दुर्घटना वारंवार होवूनही
दोषी कोण हेच ठरलेले नाही. खासदार, आमदार, नगरसेवकदेखील या समस्येकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप
ठाणेकरांकडून सातत्याने केला जात आहे.