नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ परिसरात साई जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित साई भंडारा उत्साहात पार पडला. भंडार्याचे हे पाचवे वर्ष होते.
१७ फेब्रुवारी रोजी साई भंडार्या निमित्त नेरूळ सेक्टर २ परिसरात साईबाबांची पालखी काढण्यात आली. १८ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ७ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यत साई दर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या भंडार्याचे आयोजन शिवसेना उपविभागप्रमुख मनोज चव्हाण यांनी केले होते.
साई भंडार्यात शिवसेना नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे, बेलापुर विधानसभा संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, शिवसेना शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख गणपत शेलार, स्थानिक शिवसेना नगरसेवक रंगनाथ औटी, नगरसेवक काशिनाथ पवार, परिवहन समिती सदस्य प्रदीप गवस, शिवसेना विभागप्रमुख गणेश घाग, शिवाजी महाडीक, उपविभागप्रमुख अशोक येवले, कॉंग्रेसचे कृष्णा पुजारी, माजी नगरसेवक निवृत्ती कापडणे, शिवसेना शहर संघठक रोहीणी भोईर, विभाग संघठख रेश्मा वेंर्गुलेकर, सत्वशीला जाधव, वाई तालुका संपर्कप्रमुख अशोक मुंगसे, उपविभाग अधिकारी युवा सेना श्रीकांत काळे, कुर्ला नागरी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष नारायण बांदल, पारिजात पतसंस्थेचे अध्यक्ष कृष्णा धुमाळ, गणेश कुलकर्णी, शरद पाजांरी, बाबाजी चांदे, प्रकाश वाघमारे, सुरेश मोरे, शंकर परब, संतोष अभंग, तानाजी जाधव, अभयचंद्र सावंत, आप्पा हिरवे. विलास चव्हाण आदी मान्यवर सहभागी झाले होते.
भंडार्यात ४५००हून अधिक भाविक सहभागी झाले होते. हा साईभंडारा यशस्वी करण्यासाठी साई जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक व शिवसेनेचे माजी महापालिका पक्षप्रतोद रतन मांडवे, प्रतिष्ठानच्या कार्यवाह व शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे, उपविभाप्रमुख मनोज चव्हाण, विकास म्हात्रे, सत्यम वेंर्गुलेकर, रमेश शिवतरकर, सचिन धुमाळ, गौतम धुमाळ, गौतम पवार, सदानंद भुवड, राजेश पुजारी आदींनी परिश्रम घेतले.