नवी मुंबई – मला नेता बनायचे होते परंतु चुकून मी अभिनेता झालो. कलाकारांचे व पत्रकारांचे एक अतुट नाते आहे. पत्रकार प्रसिद्धि माध्यमाद्वारे आम्हांला प्रसिद्धि देऊन मोठे करण्याचे काम करतात. सदैव जागृत प्ताहिकांच्यावतीने मला समाजभुषण पुरस्कार दिला त्यांचा मी ऋणी आहे. आता मी नवी मुंबईकरचा झालो आहे, नवी मुंबई सर्वांना समजावून घेते, याचा प्रत्यय आला असे भावपूर्ण उद्गार नाटय- सिनेकलावंत जयराज नायर यांनी उपस्थितांपुढे वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात गुरुवारी सदैव जागृतच्या द्वितीय वर्धापनदिना निमित्त केले. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे व मान्यवरांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर आ. मंदा म्हात्रे, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर,खारघर ग्रामपंचायत सदस्य अशोक गिरमकर नगरसेवक संजु वाडे, जेष्ठ पत्रकार साहित्यिक मंगेश विश्वासराव, विजय साखळकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष सोपान मेहेर, सुषमाताई भोईर, रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष ख्वाजा पटेल वाहतुक सेनेचे उपाध्यक्ष इमरान मुख्तार अन्सारी, पार्श्वगायक ज्यू बाप्पी लाहिरी, संतोष चौधरी (दादुस), नंदकुमार बर्वे व अनय मान्यवर उपस्थित होते.
आ. मंदा म्हात्रे यांच्या हस्ते अभिनेते जयराज नायर यांना नवी मुंबई समाजभुषण पुरस्कार, संतोष चौधरी यांना कोळी आगरी भुषण व पत्रकारीतेतील उल्लेखनीय कार्याबद्दल साहित्यीक व जेष्ठ पत्रकार मंगेश विश्वासराव, विजय साखळकर यांना पत्रभुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मोटार बाईक रायडर संदीप सुर्यवंशी, पत्रकार दत्तात्रय सुर्यवंशी. लक्ष्मण भेरे यांना देखिल सन्माचिन्ह देऊन गौरवण्यात आले.