कधी होणार पुर्नविकास
भयभीत झालेत रहीवाशी
21 वर्षात बनल्या फक्त 2 इमारती
मुंबई : मुंबईचा पूर्व उपनगर म्हणून ओळखल्या जाणार्या सर्वाधिक मोठा स्लम विभाग असणार्या विक्रोळी पार्क साईट परिसरील चाळी आजही पुर्नविकासाच्या प्रतिक्षेत आहेत. 1995 पासून या परिसरात अनेक विकासकांनी येवून परिसराचा कायापालट करण्याच्या आणाभाका घेतल्या. हा परिसर स्लम क्षेत्रात मोडत असल्याने एसआरए अंर्तगत या परिसरातील इमारतींची पुर्नबांधणी अटळ आहे. परंतु या परिसरात कोणत्याही विकासकाने आपल्या गृहनिर्माण प्रकल्पाला सुरूवात करण्याकरता हाचचाली सुरू केल्यावर लगेचच काही लोक यामध्ये गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या कामाला विरोध करतात, या कामामध्ये अडथळे आणतात. ज्यामुळे इमारत पुर्नविकासाला खिळ बसते. त्यामुळे गेल्या 21 वर्षामध्ये सात मजल्याच्या केवळ दोनच इमारती पूर्ण होवू शकल्या. यामध्ये केवळ 96 लोकांचेच पुर्नवसन झाले. त्यानंतर कोणत्याही विकासकाला या ठिकाणी यश मिळालेले नाही. आजही या परिसरातील अनेक लोक ट्रान्झिस्ट कॅम्पमधील धोकादायक इमारतींमध्ये नाईलाजास्तव अन्यत्र सोय नसल्याने वास्तव्य करत आहेत, तर काही रहीवाशी अन्यत्र भाड्यांच्या घरांमध्ये रहात आहेत.
सर्वप्रथम आशापुरा बिल्डरने हनुमान नगरातील आदित्य सोसायटी (1)मधील 120 आणि आदिनाथ (3) सोसायटीच्या 23 लोकांना एसआरए योजनेतंर्गत हटविले. काही कारणास्तव काही दिवसानंतर 2003 साली हा प्रोजेक्ट हिरानंदानीला सोपविण्यात आला. हिरानंदानी यांनी सम्राट अशोक सोसायटीतील 100 लोकांना प्रोजेक्टअंर्तगत हटविले. काही वर्षानंतर साज मजल्याच्या दोन इमारती बांधून तयार झाल्या. ज्यामध्ये 96 परिवार रहाण्यास गेले. 40 लोकांना जी प्लस 2 अंर्तगत ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये स्थंलातरीत करण्यात आले. उर्वरित लोक भाड्याच्या घरामध्ये रहावयास गेले. तेव्हापासून ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये लोक आपला आला दिवस ढकलत आहेत. या पुर्नविकासामध्ये अनियमितता व भ्रष्टाचार असल्याचे सांगत काही लोकांनी विरोध सुरू केला. त्यामुळे आजतागायत नव्याने पुर्नविकासाला सुरूवातच होवू शकली नाही. पुन्हा एकदा 2013मध्ये ओमकार बिल्डरच्या माध्यमातून आशेचा किरण दिसला खरा. ओमकार बिल्डरने सर्व परिसराचा सर्व्हे करत पुर्नविकासाला सुरूवात केली. पण पुन्हा काहींचा विरोध पाहून या कामाला खिळ बसली आहे.
हनुमान नगरातील रहीवाशी नाव न छापण्याच्या अटीवर, या पुर्नविकासामध्ये अडथळे आणणार्यांबाबत कडवट शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करत आहेत. काही लोक ठोस कारण नसतानाही पुर्नविकासामध्ये अडथळे आणत आहेत. यामुळे रहीवाशांना 21 वर्षापासून नाईलाजास्तव ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये रहावे लागत आहे. या विरोधामुळे पुर्नविकासाला आजवर खिळ बसली आहे. ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये भविष्यात दुर्घटना घडल्यास यास पुर्नविकासाला विरोध करणारेच जबाबदार राहणार असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
या ठिकाणचा अधिकांश भाग हा डोंगराळ आणि तहसीलदाराच्या अखत्यारीतील भाग आहे. या ठिकाणी कोठे एन.डी.झेड म्हणजेच नॉन डेव्ल्पमेंट झोन, तर कुठे आर.जी, कोठे पी.जीच्या नावाखाली हा भाग आरक्षित आहे. परिसरात ठिकठिकाणी असणारे जागांचे आरक्षणदेखील पुर्नविकासामध्ये अडथळे ठरत आहे. या ठिकाणी लाखो लोक आपल्या परिवारासह आला दिवस ढकलत आहेत. परिसरात 15 हजाराहून अधिक झोपड्या आहेत. या परिसरातील आरक्षण पूर्णपणे हटविण्याची मागणी केली जात आहे. ज्यामुळे विकासातील अडथळे दूर होतील. पुर्नविकासामध्ये अडथळे आणणार्यांवर सरकारने कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
परिसरातील सोसायटीतील काही लोक आपल्या स्वार्थाकरता साध्या सरळ भोळ्या रहीवाशांची दिशाभूल करत आहेत. लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही. एसआरए योजना ही गरीबांकरताच आहे. लोक आमच्याकडे आल्यास आम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करून मदत करू. लोक अनेक वर्षापासून या ठिकाणी कष्टमय जीवन जगत आहेत. काही लोकांचा विरोध व बिल्डरांचा गैरसमज यामुळे सर्वच रहीवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
राम कदम
स्थानिक भाजपा आमदार
ज्यावेळी या ठिकाणी बिल्डर येतात, त्यावेळी त्यांचेसोबत मध्यस्थ (दलाल) असतात. त्यामुळे लोक भयभीत होतात. काही लोकांनी विरोध केल्यास प्रकल्पच थांबतो. परिसराच्या विकास न होण्यास बिल्डरच कारणीभूत आहेत. त्यांनी दलालांकडे न जाता रहीवाशांकडे जावे. 21 वर्षापासून लोकांची ससेहोलपट होत आहे. तीन वेळा बिल्डर बदलला आहे. त्यामुळे विकासाला खिळ बसली आहे.
डॉ. भारती सुबोध बावदाने
स्थानिक शिवसेना नगरसेविका