पीपल्स इम्प्रोव्हमेन्ट ट्रस्टने डॉ. आंबेडकर भवनवर बेकायदेशीर तोडकी कारवाई केली असल्याचे आंबेडकर यांचे म्हणणे आहे. जर ही कारवाई कायदेशीर होती तर, रात्रीच्या अंधारात तोडकी कारवाई का केली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यात रत्नाकर गायकवाड यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली असून यासाठी त्यांना जबाबदार धरण्यात यावे. गायकवाड यांनी अशा प्रकारे कारवाई करून आंबेडकरी अनुयायांचा अपमान केल्याचे ही आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.
डॉ. आंबेडकर भवन विकासाच्या नावावर गायकवाड यांच्यासह काही बांधकाम व्यावसायिक ही जागा खासगी कामासाठी वापरात आणणार असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे. यासंदर्भात ट्रस्ट सांगत असलेली माहिती दिशाभूल करणारी असून याची चौकशी सरकारने करावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून राज्यभरात या कारवाईचा निषेध करण्यात येत आहे. तसेच मुंबईमध्ये ही कार्यकर्त्यांनी पनवेल – सायन महामार्ग रोखून धरला होता. स्तिथी अधिक चिघळू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्राधान्याने याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी आंबेडकर यांनी केली आहे.