राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा अभिनव उपक्रम
नवी मुबई : लोकनेते गणेश नाईक यांच्या लोकहितवादी विचारांना अनुसरून आणि आमदार संदीप नाईक यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने लोकनेते गणेश नाईक यांच्या १५ सप्टेंबर रोजी येणार्या वाढदिवसानिमित्त अभिनव अशी श्री गणेशजी नाईक ब्लड डोनर चैन हि योजना नवी मुंबईमध्ये राबविण्यात येणार आहे. त्याच बरोबर एका महारक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. या दोन समाजोपयोगी उपक्रमांची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाअध्यक्ष तथा नगरसेवक सुरज पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा युवकउपाध्यक्ष महेश पाटील, उपाध्यक्ष अरविंद पाटील, ऐरोली मतदार संघाचे युवकअध्यक्ष राजेश मढवी, उपाध्यक्ष रॉबिन मढवी, सल्लागार नगरसेवक मुनावर पटेल, बेलापूर विधानसभा युवकअध्यक्ष नगरसेवक विशाल डोळस, सिवुड्स तालुका अध्यक्ष अमित मढवी, सेक्रेटरी राहुल शिंदे, ऐरोली तालुका अध्यक्ष अमर सुतार, कुकशेतचे सोशल मीडियाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी मान्यवर आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
वैद्यकीय उपचारासाठी अथवा अपघातसमयी रक्ताची तातडीची निकड भासत असते अशा वेळी रक्तदात्यांचा शोध घेतला जातो दुर्दैवाने अनेक वेळा रक्तदाते उपलब्ध होत नाहीत. या कारणास्तव नागरिकांना संकट समयी तत्परतेने रक्त उपलब्ध होण्यासाठी ही श्री गणेशजी नाईक ब्लड डोनर चैन उपयुक्त ठरणार आहे. नवी मुंबईतील कोणत्याही नागरिकाला सहजतेने रक्त उपलब्ध होईल हा प्रयत्न असणार आहे. या ब्लड डोनर चैनमध्ये शहरातील सर्व घटकांना सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सहभागी करून घेण्यात येणार आहे. यामध्ये युवक, महिला, नोकरदार, व्यावसायिक, डॉक्टर, वकील, कामगार, रिक्षाचालक आणि सर्वसामान्यांसह सर्वच घटक या ब्लड डोनर चैनमध्ये सामाजिक जाणिवेतून जोडले जाणार आहेत. जेव्हा-केव्हा रुग्णांना रक्ताची गरज भासेल त्यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने रक्त उपलब्ध करून देण्यात येईल. सर्वोदय हॉस्पिटल समर्पण ब्लड बँकेच्या सहकार्याने ही दीर्घकालीन अभिनव योजना राबविण्यात येणार असून या ब्लड बँकेकडे ब्लड डोनर चैनशी संलग्न रक्तदाते रक्तदान करणार असून हे रक्त गरजुंना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ब्लड डोनर चैनचे संपूर्ण नियंत्रण नवी मुंबई राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून होणार आहे. या वैशिष्टयपूर्ण ब्लड डोनर चैन उपक्रमाचा शुभारंभ रविवार दिनांक ११ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी १०.३० वाजता कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयामध्ये होणार आहे. नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्याबरोबरच या उदात्त उपक्रमाची सुरुवात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते स्वतः महारक्तदान शिबिरात रक्तदान करून करणार आहेत. हे महारक्तदान शिबिर सर्वोदय हॉस्पिटल समर्पण ब्लड बँकेच्या तसेच नवी मुंबई महापालिका ब्लड बॅकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार असून एकाच वेळेस २०० रक्तदाते रक्तदान करू शकतील अशी सोय रा. फ. नाईक विद्यालयामध्ये निर्माण करण्यात येणार आहे. ११०० पेक्षा अधिक रक्तबाटल्या संकलित करण्याचा संकल्प या महारक्तदान शिबिराच्या निमित्ताने करण्यात आलेला आहे. लोकनेते गणेश नाईक यांच्या शुभहस्ते ब्लड डोनर चैन आणि महारक्तदान शिबीर या उपक्रमांचा शुभारंभ होणार आहे. त्याचबरोबर रक्त उपलब्ध करुन घेण्यासाठी ज्या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावयाचा आहे त्या मोबाईल क्रमांकांची घोषणा या प्रसंगी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाअध्यक्ष अनंत सुतार, नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे, नवी मुंबई राष्ट्रवादीचे युवकअध्यक्ष सुरज पाटील, महिला जिल्हाअध्यक्षा माधुरी सुतार, राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हा सेवादल अध्यक्ष दिनेश पारख, नवी मुंबई पालिकेतील सभागृहनेते जयवंत सुतार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक, नगरसेविका, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
______________________________ ______________________________ ______
प्रतिक्रीया…
लोकनेते गणेश नाईक साहेबांच्या लोककल्याणकारी विचारांना अनुसरून आणि आमदार संदीप नाईक साहेबांच्या संकल्पनेतून गणेशजी नाईक ब्लड डोनर चैन आणि महारक्तदान शिबीर हे दोन उपक्रम हाती घेतले आहेत. नवी मुंबईत कोणत्याही रुग्णाला रक्ताची गरज लागल्यास त्यासाठी वणवण भटकावे लागू नये हा या योजनेमागील उद्देश आहे.
– सुरज पाटील, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस नवी मुंबई
______________________________ ______________________________ ______
काय आहे ब्लड डोनर चैन उपक्रम
* रक्तदान करू इच्छिणार्या रक्तदात्यांची साखळी
* रक्तदानाच्या पवित्र भावनेतून सर्व घटकांना जोडणारा उपक्रम
* नवी मुंबई पालिकेच्या रुग्णालयांना प्राधान्याने रक्त पुरवठा
______________________________ ______________________________ ______
महारक्तदान शिबीर कोठे व केव्हा
दिनांकः रविवार, ११ सप्टेंबर २०१६
स्थळ : रा. फ. नाईक विद्यालय, सेक्टर ८, कोपरखैरणे नवी मुंबई
वेळ : सकाळी ११.३० वाजेपासून पुढे