लोकनेते गणेश नाईक यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
ब्लड डोनर चेनचा शुभारंभ
महारक्तदान शिबिरात नागरिकांचे उत्स्फूर्त रक्तदान
नवी मुंबई : जनतेवर अन्याय होत असेल तर त्याविरोधात लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरुन आंदोलन करताना प्रसंगी अटक झाली तरी हरकत नाही, असे आवाहन लोकनेते गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
नवी मुंबई राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने लोकनेते नाईक यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयात गणेशजी नाईक ब्लड डोनर चेनचा शुभारंभ त्यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच महारक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंगे्रसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी, युवकांना मार्गदर्शन करताना लोकनेते नाईक यांनी युवकांची शक्ती विधायक कार्याकडे वळवा, असे सांगितले. जीवनात होरपळलेल्या आणि कासावीस झालेल्या व्यक्तींसाठी तसेच दिव्यांग मुलांसाठी कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. ब्लड डोनर चेनची संकल्पना आमदार संदीप नाईक यांची असून ती नवी मुंबई राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष सुरज पाटील आणि युवकच्या सर्व सदस्यांनी उत्तम प्रकारे राबविल्याबददल त्यांचे कौतुक केले. या उपक्रमांतून समाजातील रक्ताची गरज पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. पोलिसांवरील वाढते हल्ले चिंताजनक आहेत. जर पोलीस चुकत असतील तर त्यांचे चुकीचे वागणे त्यांच्या वरिष्ठांना कळवावे, असे मत त्यांनी मांडले. आपल्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचे होर्डिंग लावू नयेत आणि जर लावायचे असतील तर महापालिकेची रितसर परवानगी घेवूनच लावावेत, असे आवाहन करुन वाढदिवशी अनंत चतुर्दशी असल्याने असल्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी प्रत्यक्ष उपलब्ध नसणार आहे, अशी माहिती दिली. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना युवक अध्यक्ष सुरज पाटील म्हणाले की, नवी मुंबईतील नागरिकांची रक्ताची वणवण थांबविण्यासाठी आमदार संदीप नाईक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ज्यांनी आम्हाला समाजसेवा शिकविली त्या लोकनेते नाईक यांचा वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा करण्याचे उदिदष्ट यामागे आहे. एखाद्याला जीवदान देण्याचे कार्य आपल्या प्रेरणास्थानाच्या वाढदिवशी सुरु करणे यासारखी दुसरी कुठलीही मोठी गोष्ट असू शकत नाही, या शब्दात महापौर सुधाकर सोनावणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महारक्तदान शिबिरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठया संख्येने रक्तदान केले. माजी नगरसेवक कोंडिबा तिकोणे यांनी उपलब्ध करुन दिलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आणि गणेशजी नाईक ब्लड डोनरचेन उपक्रमाच्या www. ganeshjinaikblooddonarchain. com. या संकेतस्थळाचे उदधाटन देखील लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. ब्लड डोनर चेनअंतर्गत ज्यांना रक्ताची गरज असले त्यांनी ७८१८८८३३३३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.