श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : पार्किगची समस्या दिवसेंगणिक भयावह स्वरूप धारण करू लागली आहे. इमारतीमध्ये पार्किगला जागा नसल्याने इमारतीलगतच्या रस्त्यावर मिळेल त्या ठिकाणी वाहनांची पार्किग केली जावू लागली आहे. आपली वाहने पार्क झाली म्हणजे इतरांच्या वाहनांना रहदारीस अडथळा झाला, वाहतुक कोंडी झाली तरी आम्हाला काही देणेघेणे नाही, ही प्रवृत्ती वाढीस लागली आहे. नेरूळ सेक्टर ४ परिसरात गेल्या काही महिन्यापासून तर थेट पदपथावरच वाहनांची पार्किग केली जात आहे. पदपथावरील पार्किगच्या अतिक्रमणाकडे नवी मुंबई महापालिका प्रशासन व वाहतुक पोलिस कानाडोळा करत आहेत. पदपथाची या पार्किग अतिक्रमणातून मुक्तता करण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंडेंनी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहीवाशांकडून करण्यात येत आहे.