नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्र हागणदारी मुक्त (ODF) करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राप्त झालेल्या सुचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त (स्व.म.अ.) श्रीम.रिता मेत्रेवार, उप आयुक्त (घ.क. व्य.) तुषार पवार, उप आयुक्त (परिमंडळ-2) अंबरीश पटनिगीरे व सहा. अयुक्त (घणसोली) दिवाकर समेळ यांच्या मार्गदर्शनाखाली 14/09/2016 रोजी सकाळी 5 ते 8 दरम्यान घणसोली विभागातील येथील नौसिल नाका या भागात उघडयावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर उपद्रव शोध पथकामार्फत कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये उघडयावर शौचास जाणाऱ्या 1 व्यक्तीकडुन रु.1,200/- इतकी दंडात्मक रक्कम वसुल करण्यात आली. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी उघडयावर कचरा टाकणाऱ्या 13 नागरिकांवर रु.3,100/- अशी एकुण रु.4,300/- इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदर कारवाईच्या वेळी मेगाफोनद्वारे उघड्यावर शौचास न जाण्याबाबत व सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्यासंबधी प्रबोधन करण्यात आले. सदर कारवाईच्या वेळी घणसोली विभागाचे स्वच्छता निरिक्षक श्री. जाधव, उप स्वच्छता निरिक्षक श्री. वाळवी, उप स्वच्छता निरिक्षक श्री. किनी व स्वच्छाग्रही उपस्थित होते.