नवी मुंबई : १७ सप्टेंबर रोजी साजर्या होत असलेल्या आंतरराष्ट्रीय सागर किनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निर्मल सागर तट अभियान राबविण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने १७ सप्टेंबर रोजी नवी मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त (स्व.म.अ.) रिता मेत्रेवार, उपआयुक्त तुषार पवार (घ.क. व्य.) व उप आयुक्त (परिमंडळ-१) दादासाहेब चाबुकस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई क्षेत्रातील बेलापुर विभाग क्षेत्रातील दिवाळेगाव येथील सरोवर विहार, सेक्टर-११ येथे खाडी किनार्याची मरीन टाईम बोर्ड, केंद्रिय तटरक्षक दल, स्थानिक रहिवाशी, महानगरपालिकेचे अधिकारी /कर्मचारी यांच्या सहभागाने विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमेच्या वेळी सागरी पर्यावरण संरक्षणाविषयी माहिती व प्रबोधन करण्यात आले. या मोहिमेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ-१), दादासाहेब चाबुकस्वार, मुख्य स्वच्छता अधिकारी सिध्दार्थ चौरे, बेलापुर विभागाचे विभाग अधिकारी, सुभाष अडागळे, स्वच्छता निरीक्षक श्रीम. कविता खरात, सत्यजित देवधर, रविंद्र चव्हाण व मिलिंद तांडेल, तट रक्षक दलाचे कमांडर श्रीवास्तव, कर्मचारी व स्वच्छाग्रही तसेच स्थानिक रहिवाशी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
तसेच वाशी येथील सागर विहार, सेक्टर-०८ येथे खाडी किनार्याची स्थानिक रहिवाशी, महानगरपालिकेचे अधिकारी /कर्मचारी यांच्या सहभागाने विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली व सागरी पर्यावरण संरक्षणाविषयी माहिती व प्रबोधन करण्यात आले. या विशेष मोहिमेमध्ये वाशी विभाग कार्यालयातील स्वच्छता अधिकारी विनायक जुईकर, स्वच्छता निरिक्षक श्रीम. जयश्री अढाळ, उप स्वच्छता निरिक्षक मोरे, तांडेल, स्वच्छाग्रही व स्थानिक रहिवाशी मोठयासंख्येने सहभागी झाले होते.
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ-२) अंबरीश पटनिगीरे , सहा. आयुक्त अशोक मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे ई विभाग व हॉटेल कंट्री-इन एम.आय.डी.सी. यांच्या संयुक्त विद्यमानाने सेक्टर- १९ व २० येथे सागर किनारा स्वच्छता मोहिम राबविण्यात आली व खाडी किनारा स्वच्छ करण्यात आला व सागरी पर्यावरण संरक्षणाविषयी माहिती व प्रबोधन करण्यात आले. सदर विशेष मोहिमेमध्ये कोपरखैरणे विभाग कार्यालयातील स्वच्छता अधिकारी प्रल्हाद खोसे, स्वच्छता निरिक्षक सुधीर पोटफोडे, दिनेश वाघुळदे, उप स्वच्छता निरिक्षक विजेंद्र जाधव, विजय नाईक, संजीव बेंडाळे, साळकर, हॉटेल कंट्री-इनचे संजय निर्भवणे, सिक्युरीटी मॅनेजर श्रीम. सुमन कालेर, कर्मचारी वर्ग व स्वच्छाग्रही उपस्थित होते.