मुंबई :उरणमध्ये संशयित तरुण दिसल्याच्या वृत्ताने देशातील सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान उरणच्या घटनेनंतर मुंबईत अफवांनीही जोर धरलेला दिसून आला. आता पर्यंत असे १० कॉल मुंबई तसेच इतर कंट्रोल रूम्सना आल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत गुरुवारी सकाळी सूर झालेला अफवांचा बाजार शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुरु आहे.
मुंबईच्या गिरगाव चौपाटी तसेच कुर्ला येथे संशयीत दिसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. एवढेच नव्हे तर शिवडीत इमारतीत अतेरिकी असल्याची अफवा देखील सोशल मिडीयावर पसरली. वर वायार्सारखी पसरली, मात्र इथे मोक ड्रिल सुरु होती. कुर्ला आणि गिरगावच्या तपासणी केली असता संशयास्पद काहीही न मिळाल्याचा दावा पोलीसांनी केला आहे. दरम्यान रात्रभर मुंबई शहरातील पोलीस ठाण्यातील फोन या अफवांच्या खणखणत असून कित्येक ठिकाणी संशयित दिसल्याचा दावा नागरीकांनी केला आहे. वाढत्या अफवांना बघत पोलीसांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन केले आहे.