नवी मुंबई : शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा व ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, 1963 मध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेली आहे. वर्ष 2006 मध्ये या अधिनियमामध्ये सुधारणा करून खाजगी बाजार, थेट पणन, शेतकरी-ग्राहक बाजार व कंत्राटी शेती यांची तरतूद करण्यात आली आहे. नुकतेच या अधिनियमामध्ये बदल करून फळे व भाजीपाल्यांच्या व्यवहारांचे बाजार समितीचे अधिकार बाजार आवारापुरते मर्यादित केले असुन आणखी स्पर्धा वाढविणेसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. स्पर्धा आणखी वाढविण्यासाठी शासनाकडून अनेक प्रकारचे प्रयत्न करण्यात येत आहेत. संपूर्ण जगात शेतकरी बाजार लावण्याची प्रथा अस्तित्वात आहे.शेतकरी बाजारामध्ये शेतकऱ्याला चांगला भाव, ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होतो, अशी संकल्पना राज्यात सुरू करावी यासाठी “संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार” अभियान राबविण्याचा प्रस्ताव शासन निर्णय क्र.कृपमं-0816/प्र.क्र.119/21स , दि.12/08/2016 नुसार मंजुर केलेला आहे.
त्यास अनुसरून शासन परिपत्रक क्र.संकीर्ण-2016/प्र.क्र.353/न वि-20, दि.24/08/2016 नुसार शेतकऱ्यांना त्यांचे भाज्या, फळे, अन्नधान्य आणि इतर कृषी उत्पादने थेट विक्रीसाठी महानगरपालिका/नगरपालिका यांनी त्यांच्या कार्यालयाच्या आवारात, त्यांच्या भाजी मंडईत, तसेच महानगरपालिका क्षेत्रात 3 ते 4 मैदाने, दर शनिवारी किंवा रविवारी उपलब्ध करून देणेबाबत सुचित केले आहे.
त्यानुसार, सदर अभियान यशस्वीपणे राबविणेच्या उद्देशाने सरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांना नवी मुंबई महानगरपालिका परिमंडळ-1 कार्यक्षेत्रातील खालील जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
अ.क्र.
|
विभाग
|
जागेचा तपशिल
|
1
|
बेलापुर
|
सरोवर विहार, सी.बी.डी., से.15
|
2
|
बेलापुर
|
एन.आर.आय. कॉम्प्लेक्स, सी.बी.डी.
|
3
|
बेलापुर
|
गणपतशेठ तांडेल मैदान, करावे से.-२६ नेरुळ.
|
4
|
बेलापुर
|
महानगर गॅस लि. पंपाच्या बाजुला असलेले मैदान, सी.बी.डी.
|
5
|
बेलापुर
|
सुनिल गावस्कर मैदान, सी.बी.डी.
|
6
|
वाशी
|
सेक्रेट हार्ट स्कुल ग्राऊँड, से.4, वाशी
|
7
|
वाशी
|
से.6 बी टाईप फूटपाथ (टोलनाका रोड साईट)
|
उद्या रविवार दि.16/10/2016 रोजी वाशी येथील सेक्रेट हार्ट स्कुल ग्राऊँड, से.4, वाशी येथे आठवडे बाजार दुपारी3.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत भरविण्यात येणार आहे. सदर आठवडे बाजारामध्ये सुमारे 15 ते 20 शेतकऱ्यांचे स्टॅाल लागणार आहेत. त्याचप्रमाणे गुरूवार दि.20/10/2016 रोजी वाशी येथील से.6 जागृतेश्वर मार्ग आर-रो जवळ एन.एम.एम.टी. बस स्टॅाप येथे सकाळी 8.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत आठवडी बाजार भरविण्यात येणार आहे.
“संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार” अभियान अंतर्गत शेतकरी आठवडी बाजारामध्ये“शेतातुन शेतमाल थेट घरामध्ये” या उद्देशाने प्रत्येक रविवारी दुपारी 3.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत भरविण्यात येणार आहे.