नवी मुंबई : भारताचे माजी रा्ष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना सार्थ आदरांजली अर्पण करणेसाठी आज 15ऑक्टोंबर वाचन प्रेरणा दिन म्हणून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 459 शाळांमध्ये मोठ्या उत्साहाने वअभूतपूर्व प्रतिसादासह संपन्न झाला.
नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 4 सी.बी.डी. या शाळेत 15 ऑक्टोंबर वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमाच्यानिमित्ताने महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त (सेवा) श्री. रमेश चव्हाण, परिवहन समिती माजीसभापती व विद्यमान सदस्य श्री. साबु डॅनियल, नगरसेविका श्रीम. सुरेखा नरबागे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी श्री संदीप संगवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनीआपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व विशद करीत घराघरात वाचनस्ंस्कृती रूजवून विचारांमध्ये सकारात्मक बदल घडविणे तसेच वैचारिक पातळी मजबूत करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
या सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय शालेय महासंघ व तेलंगणा राज्य शासन यांचे संयुक्त विद्यमाने रंगारेड्डी,तेलंगणा येथे संपन्न झालेल्या 62 व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत (16 ते 18 किलो वजनी गट), कांस्य्पदकपटकविणा-या नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 4, सी.बी.डी. ची विद्यार्थिनी मुत्तूलक्ष्मी स्वामी हिचा महापालिकाआयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुतूलक्ष्मी हिला शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
याप्रसंगी इनरव्हील या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या वतीने शाळेला 500 पुस्तकांची ग्रथभेट देण्यात आली.