नवी मुंबईः भुमिपुत्र सामाजिक प्रतिष्ठान, नवी मुंबई तर्फे महाराष्ट्र राज्याच्या ऐतिहासिक काळात ‘राजलिपी’चा बहुमान मिळालेल्या ‘मोडी लिपी’च्या ‘दस्तऐवजांचे प्रदर्शन आणि माहिती शिबीर’ २१ आणि २२ ऑक्टोबर २०१६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत वाशी मधील विष्णुदास भावे नाट्यगृहातील तालिम हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
सर्वांसाठी मोफत असलेल्या ‘मोडी लिपी’च्या ‘दस्तऐवजांचे प्रदर्शन आणि माहिती शिबीर’मध्ये मोडी लिपीतील कागदपत्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार असून, मोडी लिपी मुळाक्षरे ओळख, मोडी लिपी लिहिण्याची आणि वाचण्याची पध्दत समजावून सांगण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचा खरा इतिहास बखरी, इनामपत्रे, ऐतिहासिक पत्रे, राजदरबारी दस्तऐवज यात दडला आहे.
महाराष्ट्र राज्याचा खरा इतिहास समजण्यासाठी मोडी लिपी लिहिता-वाचता येणे आवश्यक आहे. त्यामुळे इतिहासप्रेमींच्या सोयीसाठी ‘मोडी लिपी माहिती शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती ‘भुमिपुत्र सामाजिक प्रतिष्ठान’चे संस्थापक-अध्यक्ष गजआनन म्हात्रे यांनी दिली.
अधिक माहितीसाठी संपर्कः ९२२३१७२६१४.