पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी न्याय मिळवून देण्याची कामगारांची मागणी
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या परीवहन विभागात कार्यरत असणार्या ६०० चालक व वाहकांचा चार वर्षाचा हक्काचा भविष्यनिर्वाह निधी संबधित कंत्राटदाराने न दिल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या ठेकेदाराला मोठा राजकिय वरदहास्त असल्यामुळेच आम्हाला आमचा भविष्यनिर्वाह निधी मिळत नसल्याचा आरोपही कर्मचारी करत आहेत.विशेष म्हणजे परीवहन प्रशासनही काहीही करत नसल्याने आमचे प्रत्येकी पन्नास ते साठ हजार बुडल्यातच जमा असल्याचेही चालकवाहक सांगत आहेत.
२००७ मध्ये प्रथमच एनएमएमटी मध्ये १२०० चालक व वाहकांची रोजंदारीवर भरती करण्यात आली.१२०० चालक व वाहक भूमी कन्स्ट्रकशन व निमाजीत कन्स्ट्रकशन यांना विभागुन देण्यात आले.त्यापैकी भुमी कन्स्ट्रकशनच्या कंत्राटदारांने आपल्याकडे असणार्या ६०० चालक व वाहकांच्या भविष्यनिर्वाह निधीचे पैसे ठेका रद्द केल्यानंतर दिले असल्याचे कर्मचार्यांनी सांगीतले .परंतु दुसर्या ठेकेदारांनी मात्र सात वर्षे उलटुन गेले तरी दिले नसल्याचे चाल्क व वाहकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ज्या ६०० कर्मचार्यांना भविष्यनिर्वाह निधी मिळाला नाही ते आजच्या घडीला ठोक पगारावर कार्यरत आहेत.त्यांनी आजतगायत आपला भविष्यनिर्वाह निधी मिळावा म्हणुन अनेकदा पत्रव्यवहार केला असल्याचे सांगीतले. परंतु त्यांना आजपर्यंत यश आला नसल्याचे त्यांनी सांगीतले. परीवहन प्रशासन ऐकत नाहीत हे पाहुन त्याकार्मचारयांनी कांदीवली येथील कार्यालयात चौकशी केली. तर तिथे त्यांची पावती पाहिली असता ते क्रमांक ट्रक ढम्पर अशा वाहनांचे निघाले. थोडक्यात संबधित ठेकेदारांने कोणत्याही प्रकारचा भविष्यनिर्वाह निधी भरलाच नसल्याचा कर्मचार्यांनी आपले म्हणणे व्यक्त केला.
निमाजीत कन्स्ट्रकशन कंपनीचा मालक एका मोठ्या पक्षाचा नेता असल्याचे चालक व वाहकांनी सांगीतले.त्याच्या शिवाय परीवहन विभागाचा एक पानही हलत नसल्याचेही कर्मचारयांचे म्हणणे आहे.त्यामुळेच एनएमएमटी प्रशासन हतबल असल्याचेही चालक व वाहकांचे म्हणणे आहे.यामुळेच कोट्यावधी रूपये या राजकीय नेत्याने गिळकृंत केल्याचे संतापाने कर्मचारी वर्ग सांगत आहेत. यासाठी ठाणे जिल्ह्याचे पाालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे असेही कर्मचार्यांनी बोलुन दाखविले. याबाबत अनेकदा सभापती मोहन म्हात्रे यांच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.
(साभार : दै. जनशक्ती – मुंबई आवृत्ती)