श्रीकांत पिंगळे
* आधी फेरीवाला धोरण ठरवा़
* व्यवसाय करतात, त्यांना परवाने द्या
* कारवाई करून संसार देशोधडीला लावू नका
नवी मुंबई : नेरूळमधील राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदानी तोफ समजली जाणारे नेतृत्व गणेश भगत गेल्या काही वर्षापासून सातत्याने गोरगरीब व उपेक्षित घटकांसाठी कार्यरत असल्याने शिवसेनेच्या नेरूळ सेक्टर 16-18 या बालेकिल्ल्यात गणेशदादा भगतांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेसला मुसंडी मारणे शक्य झाले आहे. नेरूळमधील सेक्टर 18 परिसरातील गोरगरीब फेरीवाल्यांची बाजू घेत, त्यांच्या कारवाई करून त्यांना देशोधडीला न लावण्याची मागणी नेरूळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेशदादा भगत यांनी केली आहे.
नेरुळ सेक्टर- 18, येथील पालीकेच्या मंडई साठी आरक्षीत असलेल्या मोकळ्या भूखंडावर स्वखर्चाने तात्पूरती शेड उभारून सदर विभागातील जवळपास 50 ते 55 आर्थिकदुष्ट्या सक्षम नसलेले स्थानिक रहीवाशी गेली 17 ते18 वर्षे कांदा, बटाटा,नारळ,भाजीपाला, कटलरी, कडधान्ये, इत्यादी छोटे-मोठे लघू-व्यवसाय करून आपल्या कुटूंबाचे उदरनिर्वाह करीत होते.
महापालिकेने सदर मोकळ्या भूखंडावर नियोजीत मार्केट बांधण्याचे सन 2012 रोजी ठरवीले. त्यावेळी सदर भूखंडावर लघू- व्यवसाय/फेरीवाला व्यवसाय करणार्या स्थानिक लोकांनी त्यास आक्षेप घेतला. कारण मुळात 1996 पासून पालिकेने फेरीवाल्यांना व लघू व्यवसायिकांना नवीन परवाने दिलेलीच नाहीत.
महापालिकेने सदर जागी नवीन मार्केट इमारत बांधण्याचे काम सुरु करण्यापूर्वी तेथील जवळपास 52 ते 55 व्यासायिकांना माजी नगरसेवक आणि पालीका अधिकारी वर्गाने आम्ही पालीकेतर्फे लवकरच तुम्हाला परवाने देऊन नवीन मार्केट इमारतीमध्ये प्राधान्याने जागा देऊ असे तोंडी आश्वासन देऊन सदर फेरीवाल्यांचा रितसर सर्वे करून त्यांना बाजूलाच उपलब्ध असलेल्या सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर व्यवसाय करण्यास जागा करून दिली होती.
गेली 2-3 वर्षे लघू उद्योजकांतर्फे लायसंन्स साठी अनेक चकरा पालीकेत मारूनही काही उपयोग झाला नाही, कारण शासनाकडून सकरात्मक आदेश मिळूनही पालीकेने फेरीवाला लायसंन्स साठी कोणतीही पॉलिसी अद्याप बनवलेली नाही.
13 ऑक्टोबर 2016 रोजी पालीकेने या फेरीवल्यानं वर कारवाई करून त्यांना कायमचे देशोधडीला लावले.50ते 55 फेरीवाल्यांपैकी केवळ 8 ते 10 परवानाधारक स्थानिक फेरीवाल्यांनाच नवीन मार्केट इमारतीमध्ये ओटले दिले.त्यामुळे गेले 18 वर्षे एकाच ठिकाणी व्यवसाय करणार्या फेरीवाल्यांमध्ये भविष्याची भितीे व असंतोषाचे वातावरण पसरलेले आहे.
या सर्व व्यावसायिकांनी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गणेश भगत आणि स्थानिक नगरसेविका सौ.रुपाली किस्मत भगत, समाजसेवक संजय पाथर,रवींद्र भगत यांच्या सोबत महापालिकेत अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांची भेट घेऊन फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी भाडेतत्वावर पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन फेरीवाला परवाना पॉलिसी लवकर कार्यान्वित करून त्यांना लवकरात लवकर परवाने देण्याची विनंती केली तसेच सद्य:स्थितीत सदर फेरीवाले सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर व्यवसाय करत आहेत. त्यांचेवर कारवाई न करण्यासाठी विनंती केली.