श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि जनतेला वाजवी दरात शेतमाल उपलब्ध व्हावा यादृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार “संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार” अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियान यशस्वीरित्या राबविण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांना त्यांचे भाज्या, फळे, अन्नधान्य आणि इतर कृषि उत्पादने थेट विक्री करता यावीत याकरीता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सरव्यवस्थापक,महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांना महापालिका क्षेत्रात जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
अ.क्र.
|
विभाग
|
जागेचा तपशील
|
1
|
बेलापूर
|
सरोवर विहार, सी.बी.डी., से.15
|
2
|
बेलापूर
|
एन.आर.आय. कॉम्प्लेक्स, सी.बी.डी.
|
3
|
बेलापूर
|
गणपतशेठ तांडेल मैदान, करावे से.-२६ नेरुळ.
|
4
|
बेलापूर
|
महानगर गॅस लि. पंपाच्या बाजुला असलेले मैदान, सी.बी.डी.
|
5
|
बेलापूर
|
सुनिल गावस्कर मैदान, से.1, सी.बी.डी.
|
6
|
वाशी
|
सेक्रेट हार्ट स्कुल ग्राऊंड, से.4, वाशी
|
7
|
वाशी
|
से.6 बी टाईप मार्केट (टोलनाका रोड जवळ)
|
मागील रविवारी से.4, वाशी येथील सेक्रेट हार्ट स्कुल ग्राऊंडवर भरविण्यात आलेल्या आठवडी बाजाराला उदंड प्रतिसाद लाभला. आज गुरूवारी अशा प्रकारचा बाजार वाशी से.6 येथील जागृतेश्वर मार्ग, आर – रो जवळ, एन.एम.एम.टी. बस स्टॅाप नजिक सकाळी8.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत भरविण्यात आला होता. त्यालाही नागरिकांचा उत्साही प्रतिसाद लाभला. यामध्ये 21 शेतक-यांच्या विविध प्रकारच्या शेतमालाचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी 7.5 टन शेतमाल विक्री झाली. रास्त दरात ताजी भाजी व इतर शेतमाल उपलब्ध होत असल्याने नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला व या उपक्रमाचे कौतुक करीत समाधान व्यक्त केले. अशाच प्रकारे पुढील रविवारी दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सेक्रेट हार्ट स्कुल ग्राऊंडवर तसेच गुरूवारी से.6 येथे आठवडी बाजार आयोजित केला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, 1963 मध्ये सुधारणा करून खाजगी बाजार, थेट पणन, शेतकरी-ग्राहक बाजार व कंत्राटी शेती यांची तरतूद करण्यात आली आहे. नुकतेच या अधिनियमामध्ये बदल करण्यात येऊन फळे व भाजीपाल्यांच्या व्यवहाराचे बाजार समितीचे अधिकार बाजार आवारापुरते मर्यादित केले असून त्यात निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देण्यात आले आहे. संपूर्ण जगात शेतकरी बाजार लावण्याची प्रथा अस्तित्वात असून महाराष्ट्रातही शेतकरी बाजाराचे आयोजन करून शेतकऱ्याच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा त्यासोबतच ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध व्हावा अशी संकल्पना राज्यात सुरू करण्यात आली आहे. यादृष्टीने “संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार” अभियान राबविण्यात येत आहे.
यापुढील काळात वाशीप्रमाणेच बेलापूरमध्येही आठवडी बाजार आयोजित करण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने संपूर्ण महापालिका क्षेत्रात आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात येणार आहे.