* युवा नगरसेवक गिरीश म्हात्रेंच्या परिश्रमाची ग्रामस्थांनी केली प्रशंसा
श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : नेरूळ गावामध्ये गेल्या दोन दशकाहून अधिक काळ घरासमोर, इमारतीसमोर, गॅलरीसमोर विद्युत केबल्स, वायरी लोंबकळत होत्या. यामुळे शॉर्ट सर्किटमुळे ग्रामस्थांना व स्थानिक रहीवाशांना जिवितावर टांगती तलवार घेवून वावरावे लागत होते. परंतु नेरूळ गावच्या नगरसेवकपदाची धुरा गावातीलच गिरीश म्हात्रे या युवकाकडे आली आणि अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत या समस्येचे निवारण गिरीश म्हात्रेंनी केल्यामुळे आज ग्रामस्थ व स्थानिक रहीवाशांकडून नगरसेवक गिरीश म्हात्रेंच्या परिश्रमाची प्रशंसा केली जावू लागली आहे.
नेरूळ गावामध्ये दोन दशकाहून अधिक काळ लोंबकळणार्या विद्युत वायरी व केबल्सच्या समस्येचे भयावह स्वरूप धारण केले होते. या समस्येचे निवारण करण्याकरता कोणीही पुढाकार घेत नसल्याने ग्रामस्थ व अन्य स्थानिक रहीवाशांना मृत्यूची टांगती तलवार कायम ठेवून वावरावे लागत होते. 2015 साली झालेल्या महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणूकीत नेरूळ गावच्या ग्रामस्थांनी व सभोवतालच्या स्थानिक रहीवाशांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविणार्या गिरीश म्हात्रे या युवकाला मतदानातून नगरसेवक होण्याची संधी दिली.
गावातील लटकणार्या विद्युत वायरी व केबल्सच्या समस्या सोडविण्याकरता महापालिका व एमएसईडीसीकडे नगरसेवक गिरीश म्हात्रेंनी सातत्याने पाठपुरावा सुुरू केला. परिणामी गावातून लोंबकळणार्या व लटकत्या वायरींची समस्या संपुष्ठात येवून केबल्स भूमिगत होवू लागल्या आहेत.सुरूवातीच्या टप्प्यात कृष्णा म्हात्रे यांच्या घराजवळची आणि खालची आळी तसेच गणूवाडीतील लटकणार्या वायरी व केबल्सची समस्या सोडविण्यात गिरीश म्हात्रे यशस्वी झाले असून लवकरच संपूर्ण नेरूळ गावातील ही समस्या संपुष्ठात आणणार असल्याची माहिती नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी दिली. गणूवाडीतील कृष्णा पाटील यांच्याही घरासमोर लटकत्या विद्युत वायरींची समस्या होती. पण आता या समस्येचे निवारण झाले आहे. गेली 20 वर्षे निवारण न झालेल्या या समस्येचे आता निवारण झाल्यामुळे कृष्णा पाटील व नेरूळ गावच्या ग्रामस्थांनी गिरीश म्हात्रेंचे जाहिरपणे आभार मानले आहे.