महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या पाठपुराव्यामुळे सिडकोकडून महापालिकेकडे हस्तांतरीत
नवी मुंबई : नवी मुंबई शहर विकसित करताना याठिकाणी सार्वजनिक वापरासाठी सिडकोने राखीव ठेवलेले भूखंड तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनीही सार्वजनिक प्रयोजनासाठी राखीव ठेवलेले भूखंड नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरण करण्याकरीता मागील 15 वर्षांपासून प्रयत्न सुरु होते. या प्रयत्नांना अधिक गतीमानता देत महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी या दोन्ही प्राधिकरणांकडे सातत्यापूर्ण पाठपुरावा केला असून यामुळेच सिडकोकडून दहा वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्यावर (Leave & Licence) हस्तांतरीत झालेले सार्वजनिक सुविधांसाठीचे 202 भूखंड 60 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर करून घेण्यात यश लाभले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या दि. 30 जून 2014 रोजीच्या सर्वसाधारण सभेतील मंजूर ठरावानुसार नवी मुंबई महानगरपालिकेस सार्वजनिक प्रयोजनासाठी केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, सिडको व एम.आय.डी.सी. यांच्या कडून प्राप्त झालेल्या / मागणी केलेल्या भूखंड / मिळकती महानगरपालिकेला नाममात्र दराने हस्तांतरीत करणेबाबत सिडको, एम.आय.डी.सी. व महाराष्ट्र शासन यांस विनंती करण्यात आली होती.
याबाबत महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी 2 मे 2016 रोजी आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर साकल्याने विचार करत सातत्यपूर्ण पाठपुरावा केला व त्यामुळे सिडकोकडे 15 वर्षांपासून प्रलंबीत असलेले व सिडकोने महानगरपालिकेकडे भाडेतत्वावर 10 वर्षे कालावधीसाठी हस्तांतरीत केलेले उद्यान/पार्क/मैदान याचे 126 भूखंड, प्रदर्शनी मैदानाचा 1 भूखंड, सार्वजनिक / शाळेच्या खेळाच्या मैदानांचे 21 भूखंड तसेच 25 दैनंदिन बाजार / हॉकर्स झोन, 4 मार्केट, 1 होल्डींग पाँड, 1 तलाव, 1 उच्चस्तरीय जलकुंभ, 1 नागरी सुविधा विषयक, 1 पार्किंग / शौचालय अशा प्रयोजनाचे 202 भूखंड सिडकोकडून महानगरपालिकेस 60 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर हस्तांतरीत करून घेण्यात आलेले आहेत.
त्याचप्रमाणे 48 उद्यानांचे, 27 खेळांच्या मैदानांचे, 22 मोकळ्या जागा, 5 सामाजिक सुविधांचे भूखंड तसेच 2 ट्री बेल्ट, 3 स्टील / मार्केट, 1 वाचनालय, 2 वूमन वेल्फेअर सेंटर अशा एकूण 110 भूखंडांचे सिमांकन करून प्रत्यक्ष जागेवर ताबा करून घेण्यात आला आहे.
याशिवाय सिडकोकडून दैनंदिन बाजारासाठीचे 4, रुग्णालयासाठीचे 5, पार्कींगसाठी 9, अग्निशमन केंद्रासाठीचे 2, नागरी आरोग्य केंद्रासाठी 8, टॅक्सी / रिक्षा पार्कींगसाठी 33, शाळांकरीता 6, डे केअर सेंटर करीता 3, रात्रनिवारा केंद्राकरीता 2, वूमन सेंटरकरीता 1, सिनिअर सिटिझन / वेल्फेअर सेंटर करीत 3, उद्यानाकरीता 10, दफनभूमीकरीता 1, सेंट्रलपार्कसाठी 1, सार्वजनिक / शाळेच्या खेळाच्या मैदानाकरीता 4, समाज मंदिराकरीता 1, वाचनालयाकरीता 2, इंनडोअर रिक्रिएशन करीता 3 अशा हस्तांतरण करणे कामी विविध वापराच्या 98 भूखंडांचे वाटप करून घेण्यात आले आहे.
सिडको प्रमाणेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडून भूखंड क्र. 20 ए हा भूखंड वृक्षारोपण / बाग बगीचा / सुशोभिकरण या प्रयोजनासाठी हस्तांतरण करून घेण्यात आला आहे. तसेच भूखंड क्रमांक ओ.एस.2 पी.टी, ओ.एस.2/2, ओ.एस.2/3 या 2646.64 चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडाचा ताबा घेण्यात आला आहे व या दोन्ही भूखंडांचे सिमांकन करून घेण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यापासून नागरी सुविधांकरीता राखीव सिडको व एम.आय.डी.सी. कडील भूखंड हस्तांतरीत करून घेण्याकडे विशेष लक्ष दिले असून सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे यश मिळताना दिसत आहे. त्यामुळे नवी मुंबईकर नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा पुरविण्याकडे अधिक सकारात्मक पाऊल उचलले जात आहे.