श्रीकांत पिंगळे
शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवेंच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद
नवी मुंबईः ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाव्दारे नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे नागरिकांशी थेट सुसंवाद साधत असून, या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रम अंतर्गत उद्या २६ नोव्हेंबर २०१६ रोजी नेरुळ सेक्टर-८ मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानमध्ये महापालिका अधिकार्यांसह सकाळी ६.३० वाजता उपस्थित राहून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत.
तुकाराम मुंढे यांनी नेरूळ सेक्टर आठ परिसरात हे अभियान राबवावे, नेरूळ पश्चिमेकडील लोकांना त्यांच्या समस्या आयुक्त मुंढे यांच्यापुढे मांडता याव्यात यासाठी या उद्यानात हे अभियान राबवावे याकरता नेरूळमधील प्रभाग ८७च्या शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी तीन वेळा लेखी निवेदनेही पालिका प्रशासनाकडे सादर केली होती. नगरसेविका मांडवे यांच्या प्रयत्नाला आयुक्त मुंढे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमात महापालिका आयुक्तांकडे तक्रारी/सूचना/संकल्पना मांडण्याची इच्छा असणार्या नागरिकांनी त्या लेखी स्वरूपात आणून सकाळी ६ पासून तेथे उपस्थित असणार्या महापालिका विभाग कार्यालय प्रतिनिधीकडून आपला टोकन क्रमांक
प्राप्त करून घ्यावा आणि टोकन क्रमांकानुसार महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.