श्रीगोंदा – नगर मतदारसंघाचे आमदार राहुल जगताप आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आता जनसामान्यांशी थेट संवाद साधणार आहेत.फेसबुक,ट्विटर आणि वेबसाईटचा वापर करून आमदार राहुल जगताप वेळोवेळी आपली राजकीय भूमिका, समकालीन घटनांशी निगडित भाष्य याद्वारे मतदारसंघातील लोकांशी व कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधणार आहेत.
आमदार राहुल जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या अधिकृत वेबसाईट आणि मोबाईल App चे उद्घाटन करण्यात आले या दिवसापासूनच आमदार जगताप यांनी जनतेशी थेट नाळ जोडणाऱ्या सोशल मिडीयावर सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीगोंदा – नगर च्या जनतेसाठी आणलेला निधी,आजवर झालेली विकासकामे, प्रस्तावित विकासकामे,आमदार जगताप यांचे मतदार संघातील दौरे,त्यांच्या कार्यालये तसेच संपर्क अधिकारी आदींचे मोबाईल क्रमांक आणि इमेल्स यावर आहेत जगताप यांच्या राजकीय – सामाजिक कार्याचा आढावा घेणारी हि वेबसाईट आणि मोबाईल App आधुनिक पद्धतीने बनवले असून ही वेबसाईट लवकरात लवकर लोड होते.
यापुढे ब्लॉगवरही (http://www.mlarahuljagtap.com) नियमित लिखाण करणार असल्याचा इरादा आमदार जगताप यांनी स्पष्ट केला आहे. जगताप यांच्या फेसबुक पेजच्या (https://www.facebook.com/MLARahulJagtap) माध्यमातून आपल्याला त्यांचे राजकारण-समाजकारण यावरील भाष्य, गेल्या दोन वर्षांच्या काळात केलेली विकासकामे, तालुक्यातील प्रश्न, साहित्य-संस्कृती-क्रीडा या क्षेत्रांबद्दलच्या त्यांच्या जाणिवा वेळोवेळी व्यक्त करत राहतील.
अतिशय कमी शब्दांत मोठा आशय जलद गतीने पसरवणारे माध्यम म्हणजे ट्विटर, ट्विटरच्या (https://twitter.com/MLARahulJagtap) माध्यमातून राजकीय घडामोडींबद्दलचे अधिकृत मतप्रदर्शन ते करतील.
श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदारसंघातील जनतेने पुढील लिंक ओपन करून आपण आमदार राहुल जगताप यांना लाईक, फॉलो करून त्यांच्या संपर्कात राहू शकता.तसेच मतदार संघातील तुमचे प्रश्न, अडी – अडचणी या व्यासपिठाच्या माध्यमातून मांडून आमदारांपर्यंत पोहचवू शकता .
वेबसाईट – (http://www.mlarahuljagtap.com)
मोबाईल App – आमदार राहुल जगताप
फेसबुक – https://www.facebook.com/MLARahulJagtap
ट्विटर – https://twitter.com/MLARahulJagtap