अनंतकुमार गवई
* मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडेंच्या मागणीला मुंढेंचा सकारात्मक प्रतिसाद
नवी मुंबई : महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासोबत नागरिकांच्या थेट संवादरूपी ’वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाला नागरिकांचा सगळीकडेच उत्तम प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमांतर्गत शनिवार, दिनांक ३ डिसेंबर २०१६ रोजी महापालिका आयुक्त हे संबंधित विभागप्रमुखांसह घणसोली रेल्वे स्टेशन परिसर, सेक्टर २, घणसोली येथे सकाळी ६.३० वा. उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
यावेळी नागरिक आपल्या सूचना / संकल्पना / तक्रारी याबाबत महापालिका आयुक्त यांचेशी संवाद साधू शकतात. याकरीता नागरिकांनी आपली लेखी निवेदने यावेळी सोबत आणून सकाळी ६ वाजल्यापासून उपक्रमास्थळी असणार्या महापालिका कर्मचार्यांकडून आपला टोकन क्रमांक प्राप्त करून घ्यावयाचा आहे.
या टोकन क्रमांकानुसार नागरिकांनी महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना आपले निवेदन सादर करून त्यांच्याशी संवाद साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घणसोली परिसरात दौरा करावा, येथील समस्यांची पाहणी करावी आणि स्थानिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाने कार्यवाही करावी असा लेखी आग्रह मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी करत पालिका आयुक्त मुंढे यांनी घणसोलीत ‘वॉक विथ कमिशनर’ अभियान राबवावे अशी मागणी संदीप गलुगडे यांनी केली होती.