नवी मुंबई : महानगर पालिकेकडून उत्तम आणि सर्व प्रकारच्या वैध्यकिय सेवा सुविधा सामान्य नागरिकांना मिळाव्यात या साठी मी प्रयत्नशील आहे. बेलापूर सि.बी.डी, ऐरोली आणि नेरूळ येथील मनपाचे रुग्णालय लवकरात लवकर सुरु व्हावे या करिता माझा पाठपुरावा चालू असल्याचे बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त भारतीय जनता पार्टी नवी मुंबई, गुडविल हेल्थ केयर अॅण्ड चॅरीटेबल ट्रस्ट, आचार्य श्री नानेश हॉस्पिटल व लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियंस यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या विशेष प्रयत्नाने महाआरोग्य शिबीर तुर्भे स्टोअर येथे घेण्यात आले. याप्रसंगी बोलताना आमदार सौ. मंदाताई म्हात्रे पुढे म्हणाल्या कि 42 हजाराहून अधिक झोपड्यांची संख्या असून या झोपड्यांचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे.तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंड चा प्रश्न हि प्राधान्याने मी सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. ह्या प्रसंगी मागील महाआरोग्य शिबिरातील नेत्र चिकित्सा रुग्णांना साहशे तीस चष्मे आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते मोफत देण्यात आले.
या महाआरोग्य शिबिरामध्ये मधुमेह, दमा, रक्तदाब, मानसिकताण, हृदयरोग, फुफ्फुसाचेविकार, नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू, स्त्री गुप्तरोग, गर्भाशयाचेआजार, गरोदरपणा ई. आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच सर्व तपासण्या, चष्म्याचेवाटप, शस्त्रक्रिया पूर्णपणेमोफत केल्या जातील. ह्या महाआरोग्य शिबिरास गुडविलहेल्थ केयर अॅण्ड चॅरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष श्री. जनार्धन चव्हाण, नानेश हॉस्पिटलचे सि.ई.ओ डॉ. निखील वर्गे, लायन्स क्लबऑफ नवी मुंबई चॅम्पियंस चे अध्यक्ष प्रताप मुदलियार, डॉ. प्रतिक राणे (MD.Medicine), व डॉ. सलीम खान (Opthamologist) इत्यादी डॉक्टर उपस्थित होते. ४ डिसेंबर रोजी देखील येथे महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.
सदर कार्यक्रमास *आमदार सौ. मंदाताई म्हात्रे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. नवी मुंबई भा.ज.प जिल्हाध्यक्ष श्री. रामचंद्र घरत, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मारुती भोईर, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे माजी जिल्हाध्यक्ष भगवानराव ढाकणे, माजी महापौर सुषमा दंडे, श्री.बाळासाहेब बोरकर, श्री.बिक्रम पराजुली, श्री. नितीन कान्धारी, सुरेश गायकवाड,सुरेश अहिवळे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते.