अनंतकुमार गवई
एमटीपी कायद्याचे या रूग्णालयांनी केले उल्लंघन
रूग्णालयाची नोंदणी रद्द करण्याचे आदेश
रूग्णालय चालविण्यास बंदीचे आदेश
नवी मुंबई : महानगरपालिके मार्फत बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन (सुधारीत) क्ट २००५ नुसार सर्व खाजगी रुग्णालयांची नोंदणी करण्यात येते.यानुसार नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत आयुक्त तुकाराम मुंढे यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा स्थानिक प्राधिकृत पर्यवेक्षीय अधिकारी डॉ. रमेश निकम यांचे मार्फत सुखदा हॉस्पीटल सी बी डी बेलापूर व माऊली हॉस्पीटल, ऐरोली यांनी वेळोवेळी संधी देवूनही कागदपत्रे व त्रुटींची पूर्तता न केल्यामुळे व सिध्दीविनायक रुग्णालय नेरुळ यांनी एमटीपी कायद्याचे उलघंन केल्यामुळे त्यांची रुग्णालयांची नोंदणी रद्द करुन रुग्णालय चालविणे बंद करणे बाबत आदेश देण्यात आले आहेत.
पनवी मुंबई कार्यक्षेत्रातील डॉ. शशिराज शेट्टी यांचे सुखदा स्पेशालिटी रुग्णालय एफ३-१, एफ१ टाईप मार्केट शांतीवन सोसायटी से-०६ सी बी डी बेलापूर हे रुग्णालय दि. ३१/०३/२०१६ पर्यंत नोंदणीकृत होते परंतू त्यांना पुर्ननोंदणीसाठी वेळोवेळी संधी देवूनही त्यांनी आवश्यक कागदपत्रे जसे मालमत्ता कर भरणा केल्याचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र प्रदुषन नियंत्रण मंडळ नोंदणी अद्यावत प्रमाणपत्र, अग्निशामन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र स्थानिक संस्था कर विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र व रुग्णालयातील जैविक कचरा विल्हेवाटीसाठी आवश्यक प्रमाणपत्र हे सादर केलेली नाहीत. त्यामुळे त्यांची रुग्णालयीन नोंदणी रद्द करुन एक महिन्यात रुग्णालय चालविणे बंद करणेबाबत दि. २८/११/२०१६ रोजी आदेश देण्यात आले आहेत.
तसेच डॉ.अलका शेळके यांचे माऊली रुग्णालय, से-०२ ऐरोली हे दि. ३१/०३/२०१६ पर्यंत नोंदणीकृत होते परंतू त्यांनी पुर्ननोंदणीसाठी वेळोवेळी संधी देवूनही त्यांनी आवश्यक कागदपत्रे जसे स्थांनिक संस्था कर विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र, रक्त पेढी अद्यावत नाहरकत प्रमाणपत्र, मालमत्ता कर भरणा केल्याचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ नोंदणी अद्यावत प्रमाणपत्र व अग्निशामन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांचा पुर्ननोंदणीचा अर्ज रद्द करुन नोंदणी रद्द करण्याबाबतचे दि. २८/११/२०१६ रोजी आदेश देण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे सिध्दीविनायक रुग्णालय, से-१८A नेरुळ यांचे रुग्णालय बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन (सुधारित ) ऍक्ट २००५ नुसार नोंदणीकृत होते परंतू त्यांनी एमटीपी (मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रिग्नन्शी ऍक्ट) कायदयाचे उलघंन केल्याप्रकरणी त्यांच्या रुग्णालयांची नोंदणी रद्द करुन रुग्णालय चालविणे बंद करणे बाबत आदेशीत केले आहे.