मुंबई – महावितरणाच्या भोंगळ कारभाराच्या बातम्या नेहमी ऐकायला येत असतात. मात्र, या भोंगळ कारभाराचा फटका आता थेट प्रसीद्ध गायिका आशा भोसलेंना बसला आहे. त्यांच्या बंगल्याचं एका महिन्याचं बिल तब्बल 53 हजार रूपये इतकं आलं आहे. आशा भोसलेंनी याबाबत तक्रार केली असून राज्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
लोणावळ्याजवळ तुंगार्ली गावात त्यांचा बंगला आहे. या ठिकाणी त्याचं येण-जाणं फार कमी असतं. तरीही ऑक्टोबर महिन्यात त्यांना 53 हजार 822 रूपयांचं बिल आलं. याबाबत भोसलेंनी भाजप नेते आशिष शेलार यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर शेलार यांनी उर्जा मंत्र्यांचं लक्ष याकडे वेधलं त्यावर बावनकुळेंनी पुण्याचे मुख्य अभियंता मुंडे यांना प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.