अनंतकुमार गवई
नवी मुंबई : स्पर्धा परीक्षांचे महत्व आता सर्वमान्य झाले असून स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याची मानसिकता तरूणाईत मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अशा युवक – युवतींना मार्गदर्शन करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने सकारात्मक पाऊल टाकण्याचे ठरविले असून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून 8 डिसेंबरला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
8 डिसेबर रोजी वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृहात सकाळी 11 वा. आयोजित या मार्गदर्शन शिबिराप्रसंगी सन 2005 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिकारी असणारे महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणा-या व जाऊ इच्छित असलेल्या तरूणाईला मार्गदर्शन करणार आहेत.
तरी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक – युवती यांनी शिबिरास उपस्थित राहण्यासाठी सकाळी 9.30 पासून कार्यक्रमस्थळी नाव नोंदणी सुरू होत असल्याची नोंद घ्यावी व सकाळी 11 ते 1 वा. या वेळेत शिबिरास उपस्थित राहून मौलिक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.