अनंतकुमार गवई
नवी मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त (महापरिनिर्वाण दिन) नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयात प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व रमेश चव्हाण, शहर अभियंता मोहन डगांवकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, मालमत्ता विभागाच्या उपआयुक्त श्रीम. रिता मेत्रेवार, समाज विकास विभागाच्या उपआयुक्त श्रीम. तृप्ती सांडभोर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार, शिक्षणाधिकारी संदीप संगवे, अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील, कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे उपस्थित होते.
त्याचप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर येथे अभिवादन करण्यासाठी जाणा-या नागरिकांकरीता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सी.बी.डी. बेलापूर येथील उड्डाणपुलाखाली सायन पनवेल महामार्गावर सुविधा कक्ष उभारून चहापान व्यवस्था करण्यात आली होती. याठिकाणीही महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, नगरसेविका श्रीम.सुरेखा नरबागे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, परिमंडळ 1 चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, शिक्षणाधिकारी संदीप संगवे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या सुविधा कक्षाला भेट दिली.