देशातील प्रत्येक प्रश्नाच्या निराकरणासाठी भारतीय लोकशाही व्यवस्था सक्षम
नागपूर : आपल्या लोकशाहीची रचना अत्यंत आदर्शवत असून देशातील प्रत्येक प्रश्नाचे निराकरण करण्याची क्षमता संविधानाने दिलेल्या या लोकशाही व्यवस्थेत आहे. आजच्या तरुणांनी ही लोकशाही अधिकाधिक बळकट करण्यासाठी व्यापक प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने विधानमंडळातील विधानपरिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या संसदीय अभ्यासवर्गाच्या उद्घाटन समारंभात ते बोलतहोते. याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, शिक्षण आणिसंसदीय कार्य मंत्री विनोद तावडे, आमदार ॲड. आशिष शेलार, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आदी मान्यवर उपस्थित होते. या अभ्यासवर्गात राज्यातील 11विद्यापीठांतील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विषयाचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, न्यायमंडळ, विधानमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे आपल्या लोकशाहीचे तीन स्तंभ आहेत. सरकार म्हणून ओळखले जाणारे कार्यकारी मंडळ हे राज्यातील प्रत्येक प्रश्नासाठी विधानमंडळाला उत्तरदायी असते. याशिवाय राज्यात होणाऱ्या पै-न-पै खर्चाचा आढावा शासनाला विधीमंडळास सादर करावालागतो. त्यामुळे सत्ता निरंकुश होऊ नये यासाठी त्याला विधानमंडळास उत्तरदायी ठेवण्यात आले आहे.
कायदे करणे हा विधानमंडळाचा सार्वभौम अधिकार आहे. सभागृहात अनेक महत्वाच्या कायद्यांवर 2 ते 3 दिवस चर्चा होते. महत्वाच्या कायद्यांवर चिकित्सकपणे विचार करण्यासाठी विधीमंडळ सदस्यांच्या संयुक्त समित्यांची नियुक्ती केली जाते. कायदे तयार करताना अनेक वेळा लोकांच्या सूचनाही मागविल्या जातात. राज्याच्यावेगवेगळ्या भागातून आलेले विधीमंडळ सदस्य आपले अनुभव, आपला अभ्यास आदींच्या जोरावर होऊ घातलेल्या कायद्यांवर समग्र चर्चा करतात. अशा सर्व माध्यमातूनसमग्र असा विचार करुनच विधानमंडळात कायदे तयार केले जातात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतिबिंब या कायद्यांमधून प्रभावीपणे उमटते, असेमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक – निंबाळकर म्हणाले की, भारतीय लोकशाही ही जगातील सर्वाधिक मोठी लोकशाही आहे. अगदी सरपंचपदापासून ते पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षपदापर्यंतच्या सर्व निवडींमध्ये आपण लोकशाही रुजविली आहे. त्यामुळे लोकांनीही कोणत्याही निवडीसाठी मतदान करताना वैचारिक आणिविकासासाठी मतदान करणे गरजेचे आहे, तरच आपली लोकशाही अधिक बळकट होऊ शकेल.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले की, आपला देश हा प्रचंड मोठा आणि वैविध्याने भरलेला असून देखील लोकशाही व्यवस्था सक्षमपणे राबविण्यात आपणयशस्वी झालो आहोत. संसदीय लोकशाहीला अतिशय अनुकुल असे वातावरण आपल्या देशात असून तरुणांनी ही संसदीय लोकशाही अधिकाधिक बळकट करण्यासाठीयोगदान द्यावे. विशेषत: ग्रामीण भागातील शैक्षणिक परिस्थिती बदलण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केले. विधिमंडळातील अवर सचिव सुनील झोरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.