नागपूर : देशाची दिशा आणि दशा बदलण्यासाठी तरुण महत्वाचे योगदान देऊशकतात. तरुणांनी आपल्या सामर्थ्याचा योग्य वापर करुन देशाच्या विकास प्रक्रियेतयोगदान द्यावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे केले.
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने विधानभवनातील विधानपरिषद सभागृहातआयोजित करण्यात आलेल्या संसदीय अभ्यासवर्गात ‘संसदीय कार्यप्रणाली व लोकशाहीसंवर्धनासाठी युवक चळवळींचे योगदान’ या विषयावर त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदारप्रणिती शिंदे, संगीता ठोंबरे, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे आदी उपस्थितहोते. या अभ्यास वर्गात राज्यातील 11 विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासनविषयाचे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले आहेत.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा मलानेहमीच अभिमान वाटत राहिला आहे. न्यायमंडळ, कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ हीआपल्या लोकशाहीची तीन स्तंभे आहेत. पण आपल्या लोकशाहीने कुणालाही सर्वाधिकारदिलेले नाहीत. त्यामुळे इथे कुणीच मनमानी करु शकत नाही. घटनाकारांनी फार मोठीदूरदृष्टी ठेवून लिहिलेल्या संविधानामुळेच आपली लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट होऊशकली. राज्याच्या विधीमंडळात वेगवेगळ्या भागातून आलेले प्रतिनिधी आहेत. प्रत्येकाचीराजकीय, सामाजिक किंवा वैयक्तिक विचारधारा वेगवेगळी आहे. तरीही ते जेव्हाविधानमंडळात येतात तेव्हा प्रसंगी आपल्या वैयक्तिक विचारधारेला बाजूला ठेवून ते फक्तराज्याचा विकास आणि जनतेचे कल्याण यावरच सर्वांगीण चर्चा करतात. या संयमी आणि सहिष्णु विचारधारेमुळेच आपल्या लोकशाहीला वेगळी उंची प्राप्त झाली आहे , असे त्याम्हणाल्या.
मागील काही काळात देशात फार मोठ्या घडामोडी घडत असताना देशातील तरुणांनीसंयमाची भूमिका घेतली. संयमी, विचारी आणि सहिष्णु वर्तनातूनच देशाचा सर्वांगीणविकास साधणे आपल्याला शक्य होणार आहे. आजच्या तरुणांनी याच मार्गाचा अवलंब करुनदेशाच्या विकासाच्या चळवळीला प्राधान्याचे स्थान द्यावे, असे त्यांनी सांगितले.
****
सर्वसमावेशक विकासासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा – आमदार प्रणिती शिंदे
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, आपली लोकशाही ही सर्वांना सामावून घेऊन पुढेवाटचाल करणारी आहे. इथे सर्वाधिकारी कुणीच नसून सर्व यंत्रणांचे एकमेकांवर नियंत्रणआहे. आजच्या तरुणांनी लोकशाही मार्गाने शासन यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढे येणेगरजेचे आहे. देशात काही चुकीचे घडत असल्यास त्याला अटकाव करण्यासाठीही तरुणांनीपुढाकार घेणे गरजेचे आहे. ज्या विषयात आपल्याला रस आहे अशा विषयाचा शोध घेऊनत्या क्षेत्रात झोकून देऊन काम करावे. विविधता ही आपल्या देशाची ताकद असूनसर्वसमावेशक विकासासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे संयोजन विधीमंडळाचे अवर सचिव सुनिल झोरे यांनी केले. राष्ट्रसंततुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थी मुन्ना लोणारे यांनी आभार मानले.
000000