धार्मिक स्थळांना संरक्षण द्या,
गोठिवली रस्ता रुंदीकरणात ग्रामस्थांची भुमिका समजावून घ्या
औचित्याच्या मुद्याव्दारे आमदार संदीप नाईक यांची विधानसभेत मागणी
नागपूर : नवी मुंबई मध्ये प्रकल्पग्रस्तांची व गावठाणातील इतर गरजेपोटीच्या बांधकांमांवर सिडको महामंडळ आणि नवी मुंबई महापालिका अन्यायकारक कारवाई करीत असून या कारवाईस तातडीने स्थगिती द्यावी अशी जोरदार मागणी आमदार संदीप नाईक यांनी आज (शुक्रवारी) विधानसभा अधिवेशनामध्ये केली.
नवी मुंबईच्या निर्मितीसाठी स्थानिकांनी आणि शेतकर्यांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावाने सिडको महामंडळाला दिल्या. सिडकोने प्रकल्पग्रस्तांचे पूनर्वसन वेळेत पूर्ण केले नाही त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आणि इतर घटकांनी राहण्यासाठी आणि उदरर्निवाहासाठी गरजेपोटी बांधकामे केली. या बाधकांमांना नोटीस देवून हि बांधकामे तोडण्याची अन्यायकारक कारवाई सिडको आणि महापालिका करीत आहे. असे आमदार नाईक यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या कारवाई विषयी ग्रामस्थांच्या भावना तिव्र आहेत. ग्रामस्थांची भूमिका शासनाने समजावून घ्यावी आणि गरजेपोटीच्या बांधकामांना संरक्षण द्यावे. सर्वसमावेशक कस्टर डेव्हलपमेंटची सुधारीत अंतिम अधिसूचना शासनाने तातडीने प्रसिदध करावी आणि तोपर्यंत प्रकल्पग्रंस्तांच्या गरजेपोटीच्या बांधकामांवरील कारवाईस स्थगिती द्यावी अशी मागणी आमदार संदीप नाईक यांनी सभागृहात केली.
नवी मुंबईतील धार्मिक स्थळांना सिडको आणि महापालिकेने नोटीसा बजावलेल्या आहेत. धार्मिक स्थळांवर कारवाई सुरु आहे. त्यामुळे येथील नागरीकांच्या भावना तिव्र आहेत. त्याच बरोबर गोठिवलीत रस्तांरुदीकरणामुळे अन्यायकारक कारवाई होते आहे, हे नमूद करुन शासनाने याबाबत ग्रामस्थांची भूमिका समजावून घ्यावी आणि त्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी देखील आमदार संदीप नाईक यांनी शुक्रवारी विधानसभेमध्ये केली.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या आणि इतर गरजेपोटीच्या बांधकामांना संरक्षण मिळावे यासाठी आमदार संदीप नाईक हे सातत्यांने प्रयत्नशील असून प्रकल्पग्रस्तांसोबत आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई लढत असतानांच आमदार म्हणून लक्षवेधी सूचना, तारांकित प्रश्न, औचित्याचा मुद्दा, विशेष चर्चा या माध्यमातून विधानसभेमध्ये प्रकल्पग्रस्तांचा आवाज बूलंद केला आहे.