महादेव जानकरांविरूद्ध गुन्हा दाखल
- गडचिरोली : राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्याविरूद्ध देसाईगंज येथील नगरपालिका निवडणूक कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. जाणकर हे निवडणूक अधिकाऱ्यावर कथितपणे दबाव आणत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
-
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महादेव जानकर व देसाईगंज येथील जेसा मोटवानी यांच्याविरूद्ध लोकसेवकाला काम करताना त्यांच्यावर दबाव आणल्याने भादंवि १६६ तसेच भादंवि १८६ नुसार कायदेशीर कर्तव्य पार पाडत असताना अडथळा निर्माण करणे तसेच महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औधोगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम २२(६) नुसार शनिवारी रात्री उशिरा देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे जानकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.