** आ. मंदा म्हात्रेंच्या पाठपुराव्यामुळे कार्ड मिळाल्याने कोळी बांधवांमध्ये आनंदाचा उत्साहाचे वातावरण **
नवी मुंबई : कसाब हल्ला प्रकरणानंतर देशातील सागरी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. याचा सर्वाधिक त्रास मच्छिमार, खलाशी आणि तांडेल यांना होत होता . सागरी किनारपट्टीत मासेमारी करणार्या कोळी मच्छिमार बांधवाना देण्यात आलेल्या बायोमेट्रिक कार्डामुळे त्यांना सुरक्षितता मिळणार आहे असून नवी मुंबईत पहिल्यांदाच असा उपक्रम माझ्या प्रयत्नाने होत असल्याचा आनंद होत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने मिळणार्या विविध योजनांचा लाभ मच्छिमारासाठी मिळण्यास हे कार्ड उपयुक्त आहे. ऊन , वादळ आणि वारा याच्याशी संघर्ष करीत अहोरात्र मेहनत करणार्या मासेमार बांधवांना विविध शासकीय सुविधा आणि योजनाचा लाभ मिळावा याकरिता १५ दिवसात मॅट्स विभाग आणि जिल्हाधिकारी यांची नवी मुंबईत बैठक आयोजित करणार असल्याचे प्रोतपादन बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले.
आमदार सौ . मंदाताई म्हात्रे यांच्या सौजन्याने व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे नवी मुंबईतील मच्छीमारांना बायोमेट्रिक कार्ड वितरणाचा कार्यक्रम रविवारी (दि. ११ डिसेंबर) रोजी आयोजित करण्यात आला होता. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे व सहायक आयुक्त, ठाणे, पालघर आर. बी. वायडा यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला. आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते सदर बायोमेट्रिक कार्ड नवी मुंबईतील मच्छीमारांना देण्यात आले. त्यावेळी सौ. मंदाताई म्हात्रे बोलत होत्या.
मरीआई मच्छिमार सहकारी संस्थेच्या पुढाकाराने नवी मुंबईतील मच्छिमारांना सुमारे सोळाशे बायोमेट्रिक कार्ड वितरण सोहळा वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून आ. मंदाताई म्हात्रे यावेळी बोलताना आमदार मंदाताई म्हात्रे पुढे म्हणाल्या की, मी आमदार झाल्यापासून शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करून मच्छिमार करणार्या घटकाचे प्रश्न समस्या सोडवीत आले आहे. जेट्टीची उभारणी, खाडी किनारी संरक्षण भिंत, ओटे, फिशरिंग प्रकल्प करिता १०कोटी रुपये अनुदान, फळ आणि भाजी मार्केट, समाज मंदिर आदि विधायक काम केली आहेत. नवी मुंबईच प्रवेशद्वार असणार्या वाशी गावात नियोजनबध्द, सुंदर चौपाटी
त्याच बरोबर मासेमारी घटकाकरिता विविध सोय- सुविधा , कार पार्किंग चे काम प्रगती पथावर असून वाशी गाव भविष्यात उत्तम पर्यटन स्थळ होईल असे म्हात्रे यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले. यावेळी सह.आयुक्त मत्स्य विभाग र. बी वायडा यांनी आपल्या भाषणात मासेमारी कोळी बांधवांसाठी झटणार्या आ मंदा म्हात्रे यांच्या कार्यच कौतुक केले . विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विष्णुदास भावे नाट्यगृह तुडुंब भरले होते. विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती मोठी होती.
यावेळी व्यासपिठावर भा.ज.पा नगरसेवक दीपक पवार, सुनील पाटील, सुरेश धानू (महाराष्ट्र पर्सिनेट असोसीएशन अध्यक्ष), रमण भोईर, बाळासाहेब बोरकर, प्रकाश खलाटे (भाजपा वाहतूक आघाडी, नवी मुंबई अध्यक्ष), अलगिरी (मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी), चंद्रकांत कोळी (अध्यक्ष, सर्वोदय मच्छीमार संघटना), दिलीप कोळी (सल्लागार, सर्वोदय मच्छीमार संघटना), श्रीमती. गुणाबाई सुतार (समाजसेविका), हरीष सुतार (मरिआई मच्छीमार सहकारी संस्था), दिलीप पाटील (उरण मच्छीमार संघटना) पुण्यनाथ तांडेल, सारसोळे गावच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका ते मंत्रालयदरबारी गेली नऊ वर्षे सातत्याने पाठपुरावा करणारे कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर आदी उपस्थित होते. याप्रसंगी मच्छीमारांच्या इतर समस्यां विषयी देखील मार्गदर्शन करण्यात आले.
सागरी मच्छीमार ओळखपत्र ही देशाच्या किनारपट्टीतील सागरी मच्छीमारांच्या ओळखीसाठी एक महत्वाची आवश्यक बाब आहे. ह्यामध्ये गरजू भारतीय मच्छीमारासाठी एक सागरी मच्छीमार ओळख क्रमांक आहे. स्मार्ट कार्डाच्या धर्तीवरील या ओळखपत्रात सागरी मच्छीमार ओळख क्रमांका बरोबरच इतर वयक्तिक तपशील आहे. या ओळखपत्रामुळे मच्छीमारांना एक विशिष्ठ ओळख देणारे कागदपत्र म्हणून संपूर्ण भारतात व भारताच्या किनारपट्टीवर या कार्डाची मान्यता राहते. सदर बायोमेट्रिक कार्डात मच्छीमारांचे छायाचित्र, वडीलांचे / आईचे नाव, लिंग, जन्मतारीख, बोटाचे ठसे व सागरी मच्छीमार ओळख क्रमांक असते.
*********************
सदर बायोमेट्रिक ओळखपत्राचा मच्छीमारांना खालील कामासाठी उपयोग करण्याची क्षमता आहे :
** आपली ओळख एक भारतीय नागरिक म्हणून.
** सागरी मत्स्य व्यवसाय संलग्न क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीय मच्छीमार म्हणून आपली ओळख.
** आपला पत्ता अधिकृत असल्याबाबत खात्री देणे.