* शिवसेना नगरसेवक जगदीश गवते आणि नगरसेविका शुभांगी गवते यांनी केले होते आयोजन
* सुवर्ण कोकण संस्थेचे अध्यक्ष सतीश परब यांनी केले मार्गदर्शन
नवी मुंबई / अनंतकुमार गवई
शेती व शेतीपूरक व्यवसायातील श्रीमंती , शेतकरी बाजार संकल्पना याविषयी सखोल आणि विस्तृत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन शिवसेना पक्षाचे नगरसेवक जगदीश गवते आणि नगरसेविका शुभांगी गवते यांनी मोफत उद्योजक निर्माण कार्यशाळेचे आयोजन दिघा ईश्वरनगर मधील स्वामी समर्थ सभागृहात केले होते.
या शिबिरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुवर्ण कोकण संस्थेचे अध्यक्ष सतीश परब ,उपाध्यक्ष शैलेश शृंगारे यांच्यासह आयोजक तथा स्थानिक नगरसेवक जगदिश गवते , साधना केणी, अविनाश पाटील, संजय वर्धमाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शक सतीश परब यांनी सांगितले -शेती आणि शेतीला अनुसरून अनेक व्यवसाय करता येतात. यामध्ये शेळी पालन, कुकुट पालन, मत्स्य व्यवसाय , गायी पालन असे अनेक व्यवसाय करता येतात. यात नुसता व्यवसायच नव्हे तर हे व्यवसाय करत असताना आर्थिक उत्पन्न कसे वाढवावे आणि कशा प्रकारे व्यवसाय करत असताना काळजी घ्यावी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
या शिबिरास मुंबई, नवी मुंबई, पुणे, सातारा या ठिकाणाहुन नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून शेती पूरक व्यावसायिक तज्ञ तथा सुवर्ण कोंकण अध्यक्ष सतिश परब यांना व्यावसाय कोणकोणते करावे? व्यवसाय करताना शासनाच्या योजनांचा लाभ कसा घ्यावा याविषयी प्रश्न देखील विचारले.
***********
चौकट
कोणताही व्यवसाय चालू करताना अनेक समस्या येत असतात या समस्यांवर मात करून पुढे गेलो तर एक यशस्वी उद्योजक बनतो शिवाय अनेकवेळा समोरच्या व्यक्तीकडून फसवणूक देखील होत असते,म्हणून आपण कोणताही व्यवसाय करताना योग्य निवडीनुसार करावा .
जगदीश केरकर, लघुउद्योजक
***********************
चौकट
नवी मुंबईत अनेक नागरिक हे गाव सोडून, शेती सोडून नोकरी धंद्यासाठी आले आहेत या नागरिकांना आपल्या शेती व्यवसायासह निगडित असणार्या व्यवसायांचे मार्गदर्शन दिले गेल्याने निश्चितच ते एक यशस्वी उद्योजक बनतील.
शिवसेना नगरसेवक जगदीश गवतें, आयोजक