नवी मुंबई – आयसीएल कॉलेजमधील वाढता बकालपणा, समस्यांचा विळखा व विद्यार्थ्यांची होत गैरसोय याविषयी आयसीएल कॉलेज व्यवस्थापणाला जाब विचारण्यासाठी युवा सेनेच्या नवी मुंबईतील बेलापुर विभागाच्या वतीने गुरूवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कॉलेजला भेट देण्यात आली. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाबरेकर यांची युवा सेनेच्या वतीने भेट घेण्यात आली. यावेळी युवा सेनेच्या शिष्टमंडळामध्ये बेलापुर विधानसभा युवा अधिकारी मयुर ब्रीद, उपविधानसभा अधिकारी निखिल मांडवे, चिपाराम शिलवंत, युवा सेनेचे समन्वययक सुशील सुर्वे, पालिकेतील शिवसेना नगरसेवक मनोज हळदनकर, शिवसेना विभागप्रमुख महेंद्र धुमाळ, युवा सेनेचे नवी मुंबई चिटणिस प्रवीण कांबळे, विभाग अधिकारी भूषण थोरवसे, उपशाखा अधिकारी अनुभव बेळे यांचा समावेश होता. कॉलेजमधील समस्यांविषयी युवा सेनेने प्राचार्यांना जाब विचारत 15 दिवसाच्या आत सुधारणा न झाल्यास युवा सेनेच्या वतीने कॉलेज विरोधात आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाबरेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या समस्येबाबत युवा सेनेचा कळवळा पाहून प्राचार्यांनी युवा सेनेच्या पदाधिकार्यांचे अभिनंदन केले. तसेच जानेवारी महिन्यापासून कॉलेज प्रशासनाकडून या समस्या सोडविण्यात येणार असल्याचे प्राचार्यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितले.
साभार – दै. जनशक्ती , मुंबई आवृत्ती