नवी मुंबई / सुजित शिंदे
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवराज एस.पाटील यांच्या आदेशानुसार सिडको व अनधिकृत बांधकाम विभाग (उत्तर) यांच्यातर्फे शुक्रवारी बेलापूर नोडमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची मोहिम राबविण्यात आली.
शहाबाज गावातील सेक्टर 19 मधील 240 चौ.मी. क्षेत्रफळावरील भूखंड क्र. डब्ल्यू 14-17 मागील आरसीसी फुटींग बांधकाम व शहाबाज गावातील 5000 चौ.मी. क्षेत्रफळावरील सेक्टर 19 व 20 मधील स्मशानभूमीजवळील 50 झोपड्या निष्कासित करण्यात आल्या आहेत. सदर बांधकाम सिडकोच्या मालकीच्या जमिनीवर सिडको प्रशासनाची बांधकामाबाबत कोणतीही परवानगी न घेता करण्यात आले होते.
सदर मोहिम अनधिकृत बांधकाम नियंत्रक (उत्तर) पी. बी. राजपुत, सहाय्यक अनधिकृत बांधकाम नियंत्रक (उत्तर – 1) श्वेता वाडेकर व सहाय्यक अनधिकृत बांधकाम नियंत्रक (उत्तर – 2) राजु लोकोसे व इतर अधिकारी यांच्या पथकाने अतिक्रमणधारकांच्या तीव्र विरोधानंतरदेखील सुलभरित्या पार पाडली.
अतिक्रमणाची कारवाईदरम्यान सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक निकुंभ, सिडकोचे पोलिस अधिकारी व सिडकोचे सहाय्यक सुरक्षा रक्षक सुरवसे व इतर सुरक्षा रक्षकदेखील उपस्थित होते. या कारवाईसाठी 1 पोक्लेन, 1 जेसीबी, 1 ट्रक , 4 जीप व 10 कामगार यांची नियुक्ती करण्यात आली होती.
ही मोहीम सिडको व नवी मुंबई महानगरपालिकेद्वारा संयुक्तपणे राबवण्यात आली होती. सदर मोहिमेदरम्यान म्बुलन्स नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे पुरवण्यात आली होती. कारवाईनंतर सदर भूंखंडांवर भविष्यातील अतिक्रमण थांबवण्यासाठी तात्काळ कुंपण घालण्यात येणार आहे.