नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात त्रिमूर्ती मित्र मंडळाच्या वतीने तानाजी मालुसरे मैदानामध्ये ३१ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व जगद्गुरू श्री. संत तुकाराम महाराज गाथा पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहामध्ये पहाटेे ५ ते ७ काकडा, सकाळी ७ ते ८ विष्णू सहस्त्रनाम, सकाळी ९ ते १२ गाथा पारायण, सांयकाळी ४ ते ५ प्रवचन, सांयकाळी ५ ते ६ हरिपाठ, सांयकाळी ६ ते ७ संगीत भजन, रात्री ८ ते १० किर्तन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
३१ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता शिवसेनेचे गोवा सहसंपर्कप्रमुख व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांच्या हस्ते कलशपुजन तर शिवसेना नगरसेवक रंगनाथ औटी यांच्या हस्ते विणा पुजन होणार आहे. या सप्ताहामध्ये शहाडच्या बिर्ला मंदिराचे गायन विशारद ह.भ.प गुरूवर्य शाम महाराज खोडे, जुन्नर-डिंगोरे येथील श्री संत गजानन मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प किसनमहाराज आमले हे सप्ताहामध्ये व्यासपिठ चालकाची भूमिका बजावणार आहेत.
प.पू. स्वामी मोहनानंद गिरजी महाराज ज्ञानप्रभा विद्यापीठ यांच्या आशिर्वादाने ,देहू येथील गाथा मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प गुरूवर्य पांडूरंग महाराज घुले यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ६ वर्षे चालविण्यात येणार्या या सप्ताहामध्ये गाथा पारायणात ज्ञानप्रभा विद्यापिठाछे ह.भ.प संदिप बुवा आमले, ह.भ.प उत्तम महाराज आवारे, ह.भ.प मारूती महाराज गोरे, ह.भ.प मारूती महाराज आमले, ह.भ.प बाळाराम महाराज पाटील, ह.भ.प मेहेर गुरुजी, ह.भ.प राजाराम महाराज चतुर, ह.भ.प दिलीप महाराज शेलार सहभागी होणार आहेत.
या सप्ताहामध्ये ह.भ.प महादेव महाराज मोरे (पंढरपुर), प.पू. श्री. १०८ स्वामी सर्वानंद गिरीजी महाराज, ह.भ.प जयराम महाराज भेरे (शहाड) यांची प्रवचने तर ह.भ.प सुरेश महाराज तोडे (बीड), ह.भ.प योगेश महाराज वाघे, ह.भ.प केशव महाराज शिवणे (देहू) यांची किर्तने होणार आहेत. मंगळवार, दि. ३ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ दरम्यान धर्माचार्य ह.भ.प शंकर महाराज शेवाळे (आंबेगाव-पुणे) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. सोमवार, दि. २ जानेवारी रोजी सांयकाळी ५ वाजता भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून ही दिंडी नेरूळ सेक्टर ६ परिसरामध्ये ही दिंडी काढण्यात येणार आहे.
या सप्ताहानिमित्ताने दारूबंदीवर प्रबोधन, धुम्रपानविरोधी जनजागृती, रस्ता सुरक्षा मार्गदर्शन, महिला सुरक्षितता यावर भर दिला जाणार असल्याची माहिती सप्ताहाचे आयोजक दिलीप आमले यांनी दिली.
या अखंड हरिनाम सप्ताहाच्या आयोजनासाठी त्रिमूर्ती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप आमले, कार्यक्रमाचे अध्यक्ष पप्पू यादव, उपाध्यक्ष संजय धोतरे, अशोक आतकरी, सचिव जितेंद्र ताजणे, सहसचिव रवी पवार, इम्रान नाईक, खजिनदार अनिल पाटील, सहखजिनदार दत्तात्रय उथळे, बाळासाहेब नाईकरे, अनिकेत डावखर यांच्यासह परिसरातील स्थानिक रहीवाशी परिश्रम करत आहेत.