नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम विरोधातील धडक कारवाई महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने तीव्र केली असून से. 36, करावे, नेरुळ येथील श्री. रघुनाथ तांडेल यांच्या चार मजली अनधिकृत इमारतीवर धडक कारवाई करत महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही इमारत जमीनदोस्त केली. या इमारतीला एम.आर.टी.पी. ॲक्ट 1966 नुसार नोटीस बजावण्यात आली होती. परंतु या नोटीशीला प्रतिसाद न दिल्याने ही कारवाई करण्यात आली. याकरीता काँक्रीट क्रशर मशिन, पोकलेन व जेसीबीचा वापर करण्यात आला.
त्याचप्रमाणे घणसोली विभागातील रबाळे येथे बांधकाम चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावर देखील अतिक्रमण विभागामार्फत आज धडक कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली बेलापूर विभागाचे विभाग अधिकारी श्री. सुभाष अडागळे व घणसोली विभागाचे सहा. आयुक्त श्री. दत्तात्रय नागरे आणि विभागातील सर्व अधिकारी,कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या मोठ्या प्रमाणावरील बंदोबस्तात या अनधिकृत इमारतींवर अतिक्रमण विरोधी धडक कारवाई करण्यात आली.